शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी मूल्यांकन बैठकीत तिढा सोडविण्यावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 01:31 IST

समृद्धी महामार्गाच्या जमीन हस्तांतरणाची रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सकारात्मक मार्ग काढण्याबरोबरच शेतकऱ्यांशी संवाद साधून जमीन हस्तांतरणातील तिढा सोडविला जाणार असल्याची चर्चा समृद्धी मूल्यांकनाच्या बैठकीत करण्यात आली.

नाशिक : समृद्धी महामार्गाच्या जमीन हस्तांतरणाची रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सकारात्मक मार्ग काढण्याबरोबरच शेतकऱ्यांशी संवाद साधून जमीन हस्तांतरणातील तिढा सोडविला जाणार असल्याची चर्चा समृद्धी मूल्यांकनाच्या बैठकीत करण्यात आली.जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सोमवारी समृद्धी महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांच्या ‘टास्क फोर्सची‘ची बैठक बोलविली होती. यावेळी त्यांनी महामार्ग कामाची प्रगती व अडथळे याचा आढावा घेण्यात आला. समृद्धी महामार्गातील अडचणी समजावून घेण्याबरोबरच कोणत्या मुद्द्यावर शेतकºयांशी संवाद साधून यातून मार्ग काढता येऊ शकेल याबाबत अधिकाºयांशी चर्चा केली. काही तांत्रिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढला जाईलच शिवाय यापूर्वी हस्तांतरण करण्यात आलेल्या, परंतु अद्यापही शेतकºयांच्या ताब्यातच असलेल्या जमिनी मिळविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाणार आहे.सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील मºहळ बुद्रूक, खंबाळे, पिंगळगाव डुकरा, डुसंगवाडी येथील जमिनीच्या भूसंपादनाचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. सदर जमिनी पाटबंधारे विभागाने यापूर्वीच संपादित केलेल्या आहेत, त्यांचा मोबदला शेतकºयांना देण्यात आलेला आहे, मात्र त्यांची मालकी अद्यापही शेतकºयांकडेच आहे. या जमिनी ताब्यात घेण्यासाठी प्रारंभी शेतकºयांना नोटिसादेखील देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.हस्तांतरित जमिनी देण्याबाबत होणारा विरोध कमी करण्यासाठी शेतकºयांशीदेखील चर्चा केली जाणार आहे. शेतकºयांकडून होणाºया विरोधामुळे काही ठिकाणी समृद्धी महामार्गाचे काम खोळंबले आहे, मात्र आता हे काम मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिलेजाईल यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत. बैठकीत महामार्गाच्या कामासाठी पाणी उपलब्धता, गौण खनीज परवानग्या व इतर आवश्यक परवाने याबाबत आढावा घेतला गेला.जेथे गरज तेथे होणार गाळ उपसाछोटे बंधारे, धरण तलावातील गाळ काढण्यासाठी सुरू असलेल्या कामाचा आढावादेखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी घेतला. यावेळी त्यांनी ठेकेदार करीत असलेल्या कामकाजाची माहिती घेतली असता ठेकेदार हे आपल्या सोयीने गाळ काढण्याचे काम करतात. मात्र त्यातून अपेक्षित काम होताना दिसत नाही. ज्या ठिकाणी गाळ काढल्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता वाढू शकते अशी यादी ठेकेदारांना दिली जाणार असून, त्यानुसारच ठेकेदारांनी गाळ काढणे अपेक्षित आहे. या संदर्भातील सूचना ठेकेदारांनादेखील दिल्या जाणार आहेत.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय