शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सर्व पक्षीय नागरी सत्काराने पालकमंत्रीपदाची चर्चा

By संजय पाठक | Updated: February 1, 2025 18:34 IST

नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी ॲड. माणिकराव कोकाटे, शिंदे सेनेचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच भाजपचे गिरीश महाजन यांची दावेदारी आहे.

नाशिक- नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच राज्याचे कृषी मंत्री आणि पालकमंत्रीपदाचे दावेदार राष्ट्रवादीचे नेते माणिकराव काेकाटे यांचा आज नाशिकमध्ये सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे नाशिकच्या राजकीय पक्षांना कोकाटे हेच पालकमंत्री हवेत अशीही मागणी जोर धरू लागल्याची चर्चा आहे.नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी ॲड. माणिकराव कोकाटे, शिंदे सेनेचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच भाजपचे गिरीश महाजन यांची दावेदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती घोषीत केली. मात्र, महायुतीतील प्रतिष्ठेच्या प्रश्नामुळे महाजन यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. अद्याप हा तिढा सुटलेला नसतानाच कृषीमंत्री माणिकराव काेकाटे यांचा सर्व पक्षीय नागरी सत्कार आज गुरूदक्षीणा हॉलमध्ये करण्यात आला. विशेष म्हणजे यापूर्वी अशाप्रकारे कोणत्याही मंत्र्यांचा सर्वपक्षीय सत्कार झालेला नाही. मात्र, काेकाटे यांच्या नशिबी हे सुख आले. शिंदे सेना, उध्दव सेना, भाजप- कॉंग्रेस असे महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. त्यामुळे सर्वांना पालकमंत्री म्हणून कोकाटेच हवे अशीही चर्चा रंगली.माणिकराव कोकाटे पाचव्यांदा निवडून आले असून त्यांना मंत्रीपद प्रथमच मिळाले आहेत. मात्र, पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असताना एनएसयुआय, युवक काँग्रेसमध्ये  काम केले असून सर्वपक्षीय मित्रत्वाचे संबंध असल्याने नाशिकमध्ये सध्या असलेल्या तीन मंत्र्यापैकी भुसे किंवा झिरवाळ वगळता केवळ कोकाटे यांचाच अशा प्रकारे सर्व पक्षीय नागरी सत्कार झाला आहे. त्यामुळेच चर्चांना उधाण आले आहे.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेGirish Mahajanगिरीश महाजन