शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अन् चर्चा नरेंद्र मोदींच्या नाशिक दौर्‍याची

By admin | Updated: May 27, 2014 01:11 IST

नाशिक : नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि मग त्यांच्या गुणगानाची चर्चा सुरू झाली. नाशिक भाजपा तर इतक्या उत्साहात आहे की, मोदींच्या परवानगीशिवाय त्यांच्या भेटीची तारीख मुकरर केली. इतकेच नव्हे तर नाशिक भेटीचीही घोषणा करून टाकली.

नाशिक : नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि मग त्यांच्या गुणगानाची चर्चा सुरू झाली. नाशिक भाजपा तर इतक्या उत्साहात आहे की, मोदींच्या परवानगीशिवाय त्यांच्या भेटीची तारीख मुकरर केली. इतकेच नव्हे तर नाशिक भेटीचीही घोषणा करून टाकली.नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा अवकाश त्यांच्या चाहत्यांपेक्षा त्यांच्याशी जवळीक साधणार्‍यांची माध्यमांकडे गर्दी होऊ लागली आहे. मोदींची आणि आपली भेट, त्यांच्याशी झालेला संवाद किंवा अन्य प्रसंगाच्या निमित्ताने आलेला संपर्क असे अनेक जण उत्साहात सांगत असतात. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी अनेक जण आसुसले असणार, त्यात स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांचा समावेश असून ते स्वाभाविकही आहे. त्यासाठी आता कुंभमेळ्याचे निमित्त शोधण्यात आले आहे. मग, शपथविधी कधी संपतो ना कधी नाही, असे झाल्यास नवल वाटणार नाही. तरीही नाशिकचे उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी मोदींना भेटण्यासाठी कुंभमेळ्याचे कारण आणि भेटीचा मुहूर्त जाहीर केला आहे. कुंभमेळ्यात नाशिकला जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी येत्या १५ जून रोजी भाजपाचे प्रतिनिधी मंडळ मोदी यांची भेट घेणार आहेत. अर्थात, भेटीचा हा मुहूर्त मोदी यांना माहिती आहे किंवा नाही हे ज्ञात नाही. तथापि, कुलकर्णी यांनी तसे जाहीर करून टाकले आहे. त्याविषयीदेखील ना नाही परंतु आता याच उपमहापौरांनी मोदी यांची नाशिक भेटीचीदेखील वाच्यता करून टाकली आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी मोदी जून महिन्यात नाशिकला भेट देणार असून, तसे उपमहापौरांनीच स्पष्ट केल्याचे काही मुंबईच्या मुद्रीत माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे मोदींचे समर्थक भारावून गेले असून, पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. मोदी भेटीचा मागोवा घेणार्‍या उपमहापौरांनी कानावरच हात ठेवले आहेत. आपण अशी माहितीच दिली नाही, ज्यांनी चुकीची चर्चा पसरवली ते आपल्याला कधीही भेटले नाहीत, आपण फक्त १५ जून रोजी दिल्लीत मोदी यांची भेट घेण्याचेच जाहीर केले होते, असे त्यांनी सांगितले. मात्र, ही तारीख तरी कशी मुकरर झाली, हे मात्र ते सांगू शकले नाही.