शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली बोर्डाकडून वाहनांना  दंड आकारणी करताना भेदभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:21 IST

कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून रस्त्यालगत पार्किंग केलेल्या वाहनांना दंड आकारताना भेदभाव करण्यात येत असल्याची तक्रार असून, आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम अधिक असल्याने बाहेरगावाहून खरेदीसाठी येणारे ग्राहक देवळाली कॅम्पला येण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.

देवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून रस्त्यालगत पार्किंग केलेल्या वाहनांना दंड आकारताना भेदभाव करण्यात येत असल्याची तक्रार असून, आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम अधिक असल्याने बाहेरगावाहून खरेदीसाठी येणारे ग्राहक देवळाली कॅम्पला येण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.देवळाली कॅम्पमध्ये रस्त्यालगत असलेल्या फूटपाथवर अनेक ठिकाणी फेरीवाल्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून पहिल्यांदा ते काढणे गरजेचे असताना त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही. त्याचप्रमाणे वाहने एक दिवसाआड रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूला समविषम तारखेला विशेष अशी रंगाची पट्टी मारून त्याबाहेर लावण्यात येणाºया वाहनांवर कारवाई करणे अपेक्षित असताना तसे होत नाही.कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून आकारण्यात येणारी दंडात्मक रक्कम कमी करावी तसेच वाहने उभी करतानाच वाहनधारकांना माहिती समजेल असे फलक लावावेत, अशी मागणी रतन चावला आणि नागरिकांनी यांनी केली आहे.एकच नियम लावण्याची मागणीदोन दिवसांपूर्वी दुपारी बारा वाजता हौसनरोडवर विजयनगर येथील रहिवासी एका रुग्णाला घेऊन देवळाली कॅम्प येथे आला होता. आपली चारचाकी इतर चारचाकीच्या बाजूला उभी करून ते समोरील दुकानात गेले. त्यावेळी त्यांची चारचाकी नाशिकची पासिंग नसल्यामुळे तिच्यावर दंडात्मक कारवाई तसेच व्हील लॉक करण्यात आले. यासंदर्भात विचारणा केली असता, वाहन स्थानिक नसल्याचे कारण देण्यात आले.विशेष म्हणजे याच ठिकाणी देवळाली कॅम्पमधील राजकीय पुढाºयाच्या समर्थकाची गाडी उभी होती त्यावर मात्र कारवाई करण्यात आली नाही. यामुळे दंड आकारतानाही देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून भेदभाव होत असल्याचा अनुभव अनेक दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना येत आहे. प्रशासनाने नो पार्किंगबाबत निश्चित धोरण आखताना सर्वांना एकच नियम लावून दंड करावा, अशी मागणी देवळाली कॅम्प परिसरातील नागरिक करू लागले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक