शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

१७७ ग्रामपंचायतींचा अनियंत्रित कारभार उघड आयुक्त संतप्त : विभागीय आयुक्तांनी अधिकाºयांना खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 01:38 IST

नाशिक : ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जात असतानाही १७७ ग्रामपंचायतींकडून अनियंत्रित आणि स्वैर कारभार सुरू आहे.

ठळक मुद्देअधिकाºयांची चांगलीच कानउघाडणीआढावा घेण्यासाठी विशेष बैठक

नाशिक : ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जात असतानाही जिल्ह्यातील १७७ ग्रामपंचायतींकडून अनियंत्रित आणि स्वैर कारभार सुरू असल्याची बाब विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ग्रामपंचायतींच्या कारभार तीव्र आक्षेप घेत या ग्रामपंचायतींवर कारवाईचे संकेत दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या तालुका तसेच ग्रामपातळीवर कामकाजात अक्षम्य उदासिनता आणि अनियमितता आढळून आल्याने त्यांनी अधिकाºयांची चांगलीच कानउघाडणी केली. मुख्य कार्यकारी अधिकाºयांपासून तालुकास्तरावरील अधिकाºयांनाही त्यांनी चांगलेच सुनावल्याचे समजते. कामातील दिरंगाई आणि अपूर्ण दप्तर पाहून दोन अधिकाºयांना त्यांनी कक्षाबाहेर काढून दिल्याचेही बोलले जात आहे. विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक बोलाविली होती. जिल्हा परिषदेचे अधिकारी, खातेप्रमुख, गटविकास अधिकारी आदी अधिकाºयांच्या कामकाजाचा आढावा घेताना कामकाजात कोणतेही गांभीर्य नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. विशेषत: ग्रामपंचायतींचा आढावा घेताना सर्व नियम डावलून कामकाज होत असल्याने त्यांनी तीव्र आक्षेप नोंदविले. ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आढावा घेत असताना १७७ ग्रामपंचायतींकडे कामाचे आणि खर्चाची कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. कामे करताना विनानिविदा केलेली कामे, खर्चाचे नियोजन, आराखडा यांची कागदपत्रे नसताना कामकाज होत असल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत विशेष अधिकारान्वये या ग्रामपंचायतींवर प्रसंगी बरखास्तीची कारवाई करण्याचाही इशारा दिला. महिला बालकल्याण विभागाचा खर्च गेल्या दोन वर्षांपासून झालेलाच नसल्याने विभागीय आयुक्त चांगलेच संतापले. कोट्यवधींचा निधी असतानाही कामे केली जात नसल्याने त्यांनी संबंधितांना जाब विचारला. कामातील अनियमिता आणि गांभीर्य नसल्याने सर्व नियम डावलून कामांबाबत उदासिनता असल्याने त्यांनी अधिकाºयांना नियमानुसार कामकाज करण्याचा सल्ला दिला. कोणत्याही कामाचे योग्य नियंत्रण होत नसल्याने कामकाजात अनेक गंभीर स्वरूपाच्या त्रुटी असल्याची बाब त्यांनीच अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. वर्गखोल्या, शौचालये, प्राथमिक आरोग्य केंद्राची देखभाल या कामांतील अनियमिततेबाबतही त्यांनी तीव्र ताशेरे ओढले. शासकीय विकासाची कामे करताना काही नियमावली आणि गुणवत्ता ठरवून दिलेली आहे. याचे कुठेही पालन होताना दिसत नाहीच किंबहुना नियमाच्या बाहेर जाऊन कामकाज करण्यात येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महिला बालकल्याण, बांधकाम, अर्थ आणि प्रशासकीय कामकाज अनियंत्रित झाले असल्याचे सांगून नियमात राहून कामकाज करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.१ मार्चचा अल्टिमेटमविभागीय आयुक्त महेश झगडे यांनी प्रत्येक विभागाला त्यांचे काम, कर्तव्य नियंत्रण आणि गुणवत्तेबाबतीत दक्ष राहाण्याबाबतच्या सूचना दिल्या. या बैठकीत आढळून आलेल्या त्रुटी, तसेच जे विभाग कागदपत्रे सादर करू शकले नाहीत किंवा खर्चाचे हिशेब मांडू शकले नाहीत त्यांना १ मार्चचे अल्टिमेटम देण्यात येणार असून, त्यांच्या कामकाजाचा पुन्हा आढावा घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी बैठकीत सांगितले.