शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 15:06 IST

नांदुरशिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने म्हाळुंगी नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदीवरील भोजापूर धरण शनिवार (दि.15) आँगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. अवघ्या तीन दिवसातच धरणात पन्नास टक्के पाण्याची आवक झाली आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे 539 क्यूसेक पाणी सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देभोजापूर धरण ओव्हरफ्लो : अवघ्या तीन दिवसात पन्नास टक्के पाण्याची आवक

नांदुरशिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने म्हाळुंगी नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदीवरील भोजापूर धरण शनिवार (दि.15) आँगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. अवघ्या तीन दिवसातच धरणात पन्नास टक्के पाण्याची आवक झाली आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे 539 क्यूसेक पाणी सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्या दोन महिन्यापासून पावसाचे माहेरघर असलेल्या पश्चिम पट्ट्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तालुक्यातील धरणात अल्प प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होता. पंरतु गेल्या गुरुवारपासून जोरदार पाऊस झाल्याने म्हाळुंगी नदीला पूर आला आहे. ठाणगाव जवळील उंबरदरी धरण ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे म्हाळुंगी नदीला पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. नदी प्रवाहित झाल्याने भोजापूर धरणात 10 आँगस्टपासून पाणी येण्यास सुरुवात झाली होती. अवघ्या पाच दिवसात धरणात 70 टक्के पाण्याची आवक झाल्याने 361 दशलक्ष घनफूट क्षमतेचे भोजापूर धरण शनिवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर सुरुच असल्याने म्हांंळुगी नदीद्वारे धरणात दररोज 500 ते 600 क्यूसेकने पाण्याची आवक होत आहे.भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मनेगावसह 16 गावे व कणकोरीसह 5 गावे नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावर नांदूरशिंगोटे व परिसराचे शेती व्यवसाय अवलंबून आहे. धरण भरल्यामुळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे. सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने म्हांंळुगी नदीजवळील बंधाऱ्यात पाणी पोहोचले आहे. दरवर्षी लाभक्षेत्रातील शेतकरी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची वाट पाहत असतात. नेहमी आँगस्ट महिन्याच्या मध्यवर्ती भोजापूर धरण भरण्याचा इतिहास आहे. पंरतु यावर्षी धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी होते तर नांदूरशिंगोटे परिसरात पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात होते. दोन महिन्यांत झालेल्या पावसामुळे लाभ क्षेत्रातील सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. पावसाच्या पाण्याने बंधारे भरल्याने जामनदीचे पाणी पांगरी शिवाराच्या परिसरात पोहचले आहेत. नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र पाण्याच पाणी असल्याने अद्याप धरणाचे पाणी सोडण्याची मागणी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरण पूर्णपणे भरले असून सांडव्यातून पडणारे पाणी. 

 

टॅग्स :WaterपाणीDamधरण