शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दहा धरणांतून विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 02:52 IST

जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, १६ धरणांतील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. पाऊस अद्याप सुरूच असल्याने जिल्ह्यातील १० धरणांतून विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के पाणीसाठा झाला असून, त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मिटला आहे, शिवाय आगामी उन्हाळा सुसह्य होणार आहे. 

ठळक मुद्दे१६ धरणे फुल्ल : आगामी उन्हाळा होणार सुसह्य

नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, १६ धरणांतील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. पाऊस अद्याप सुरूच असल्याने जिल्ह्यातील १० धरणांतून विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के पाणीसाठा झाला असून, त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मिटला आहे, शिवाय आगामी उन्हाळा सुसह्य होणार आहे. जिल्ह्यात अनेक भागात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जिल्ह्यात अद्यापही पावसाचा धडाका सुरूच असल्याने धरणांतील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यात जिल्ह्यातील आळंदी, पालखेड, तिसगाव, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, नांदूरमधमेश्वर, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या,  गिरणा, पुनंद आणि माणिकपुंज या धरणांतील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. त्यामुळे दारणा धरणातून ५५० क्यूसेक, भावलीतून २६ क्यूसेक तसेच वालदेवीतून १६, कडवातून ४२४, नांदूरमधमेश्वरमधून ३६३२, भोजापूरमधून ११४, चणकापूरमधून ६०, हरणबारीतून ३३, नागासाक्यातून २१२, तर गिरणातून ९२९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांमध्ये गंगापूर (९७ टक्के), काश्यपी (७५ टक्के), गौतमी गोदावरी (८७ टक्के), करंजवण (९४ टक्के), वाघाड (९९ टक्के), ओझरखेड (९४ टक्के), पुणेगाव (९९ टक्के), मुकणे (८३ टक्के) पाणीसाठा झाला आहे.  जिल्ह्यातील धरणांसह लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये सद्य:स्थितीत ९६ टक्के पाणीसाठा आहे, तर गतवर्षी हाच साठा ९८ टक्के होता. यंदा १६ प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झालेला आहे, तर मागील वर्षी आजच्या तारखेला २१ धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा होता. यंदा धरणे फुल्ल झाल्याने सिंचनाचा प्रश्न मिटला असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तर अनेक भागातील भूजल पातळीत वाढ झाल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूक