शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणातून दीड हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; गोदावरीच्या पातळीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 13:51 IST

लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत आहे.

नाशिक : गंगापूर धरणातून दीड हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने रामकुंडात देखील मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून येत आहे. नाशिककरांच्या पारंपरिक पूर मापक असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या पायापर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत आहे.

नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला मध्यरात्री देखील पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शनिवारी दुपारी साडेचार वाजेपासून गंगापूर धरणातून तीन हजार क्युसेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविला गेला. आज सकाळपासून पावसाने काही प्रमाणात धरणक्षेत्रात उघडीप दिली आहे. सध्या गंगापूर धरणाचा जलसाठा 94 21 टक्के इतका इतका आहे. यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आंबोली, त्रंबकेश्वर, गौतमी, काश्यपी या परिसरात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा निसर्गामध्ये वाढ केली जाण्याची शक्यता असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान तीन दिवसांपासून गंगापूर धरणाचा विसर्ग सुरू होता तो कमी करण्यात आलेला होता. शनिवारी दुपारपासून शहर परिसरात देखील पावसाच्या हलक्‍या सरींनी रिपरिप सुरू आहे यामुळे गोदावरीच्या पातळीत पावसाचे पाणी देखील येत असल्याने हळूहळू अहिल्यादेवी होळकर पुलाखालून पुढे रामकुंडात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढू लागला आहे. सध्या होळकर पुलाखालून पुढे नदीपात्रात दोन हजार 438 हे क्युसेक्स इतका पाण्याचा प्रवाह असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.गंगापूर धरण समूहातील लघु प्रकल्प असलेल्या कश्यपी धरण 62 टक्के तर गौतमी 72 टक्के भरले आहे. पहाटे 6 वाजेपर्यंत गंगापूरमध्ये 16 तर आंबोलीत 33, गौतमीच्या क्षेत्रात 26 आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 19 मिमी इतका पाऊस पडला. गंगापूर धरणात 105दलघफू इतके पूरपाणी पोहोचले. गंगापूर धरणातून 1 हजार 560 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या गोदावरीच्या पात्रात सुरू आहे. दरम्यान, नदीकाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.