शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमधमेश्वरमधून ९६६७ क्यूसेकचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 16:13 IST

सायखेडा : दारणा आणि गंगापूर धरणातून गोदावरी नदीला पाणी सोडल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, पूरपरिस्थिती निर्माण होऊ ...

सायखेडा : दारणा आणि गंगापूर धरणातून गोदावरी नदीला पाणी सोडल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नांदूरमधमेश्वर धरणातून ९६६७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे तूर्तास गोदाकाठ भागातील पूरपरिस्थितीचा धोका टळला आहे.इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्यात चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. पावसाच्या माहेरघरी पाऊस पडत असल्यामुळे त्या परिसरातील धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे. दारणा धरणातून ५५४० आणि गंगापूर धरणातून ३०६८ इतक्या पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात काल दुपारी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली. गोदाकाठ भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे.----------------------------पुराचा धोका टळलागोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली की सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चाटोरी, चापडगाव, मांजरगाव, काथरगाव, दिंडोरी चास, कोठुरे, गोंडेगाव या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसतो. सगळीकडे पाणी पसरते आणि शेतातील पिके पाण्याखाली येतात. पाणी काही महिने कमी होत नाही. त्यामुळे हाती आलेले पीक वाया जाते असे अनेक वर्ष सातत्याने घडते. त्यामुळे धरणात साचलेला गाळ काढून गेटची संख्या वाढवणे गरजेचं आहे. म्हणजे पूर पाण्याचा फटका शेतीला बसणार नाही आणि गाव पाण्याखाली येणार नाहीत. गोदाकाठ भागात पाऊस पडत नसल्याने केवळ इतर धरणांतून येणाऱ्या पाण्यामुळे विसर्ग वेळेत सोडल्याने पुराचा धोका टळला आहे. अन्यथा यंदाचा पहिला पूर गोदाकाठ भागात आला असता असे जाणकार सांगतात.-----गोदावरी नदीच्या पात्रात नांदूरमधमेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे धरणाच्या गेटजवळ पाणी कमी जाते. जास्त पाण्याचा फ्लो मागे राहातो. त्यामुळे गोदाकाठला पूरपरिस्थिती निर्माण होते, शेती पाण्यात अनेक महिने राहिल्याने नुकसान होते.- गोकुळ गिते, माजी संचालक, पिंपळगाव बाजार समिती

टॅग्स :Nashikनाशिक