शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमधमेश्वर धरणातून ९ हजार ४६५ क्युसेकने विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 21:39 IST

नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्गामध्ये वाढ केली जात असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील गोदाकाठालगतच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून दिला जात आहे.

ठळक मुद्देनांदूरमध्यमेश्वर बंधारा लघुप्रकल्पात आवक वाढली बंधारा १०० टक्के भरला आहे

नाशिक : शहरासह जिल्ह्यात गेल्या शुक्र वारपासून मान्सून सरींनी जोरदार हजेरी सुरू आहे. सोमवारी (दि.१५) शहरात ३६.१ मिमीपर्यंत पाऊस नोंदविला गेला. पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात नांदूरमध्यमेश्वर धरणात पूरपाण्याची आवक होत असल्याने या लघुप्रकल्पाची क्षमता आता संपुष्टात आली आहे. यामुळे सातत्याने या धरणातून शुक्र वारपासून विसर्ग सुरू आहे. सोमवारी संध्याकाळपासून विसर्गात वाढ करण्यास सुरूवात झाली. रात्री नऊ वाजेपर्यंत धरणातून ९ हजार ४६५ क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू करण्यात आला होता.शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सातत्याने पावसाची जोरदार सलामी सुरू आहे. तसेच दारणा धरणातून गोदावरी डावा, उजवा आणि जलद कालव्यासाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे. एकीकडे दारणाचे सुरू असलेले आवर्तन आणि गोदावरीच्या पात्रातून येणारे पूरपाणी यामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधारा लघुप्रकल्पात आवक वाढली असून बंधारा १०० टक्के भरला आहे. यामुळे बंधार्यातून सातत्याने विसर्ग केला जात आहे. गोदापात्रातून हे पाणी थेट जायकवाडीला जाऊन मिळत आहे.नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्गामध्ये वाढ केली जात असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील गोदाकाठालगतच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून दिला जात आहे. नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाद्वारे दर तासाला नांदूरमध्यमेश्वर धरणातून होणारा विसर्ग अहमदनगर आपत्ती व्यवस्थापनाला कळविला जात आहे. यामुळे नदीकाठालगत सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वर