शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणातून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:13 IST

नाशिक : गंगापूर धरणातील पाणी आवर्तन निश्चित केल्यानुसार, गेल्या शक्रवारपासून रब्बी पिके, तसेच एकलहरे औष्णिक केंद्रासाठी ७०० ते ८०० ...

नाशिक : गंगापूर धरणातील पाणी आवर्तन निश्चित केल्यानुसार, गेल्या शक्रवारपासून रब्बी पिके, तसेच एकलहरे औष्णिक केंद्रासाठी ७०० ते ८०० क्युसेकने विसर्ग केला जात आहे. पुढील पंधरा दिवस धरणातून पाणी सोडले जाणार आहे.

गंगापूर धरणातील पाण्याचे नुकतेच पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आरक्षण निशिचत करण्यात आले होते. त्यानुसार, रब्बी हंगामातील पिके, तसेच एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पिण्याचे पाणी, सिंचन आणि उद्योगासाठी मागणीनुसार पाणी दिले जाणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे.

गेल्या शुक्रवारी पाटबंधारे विभागाने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. रब्बी हंगामातील पिके, तसेच एकलहरे येथील वीज केंद्रासाठी हे पाणी सोडण्यात आले. सुमारे ७०० ते ८०० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात असून, पुढील पंधरा दिवस गंगापूर धरणातून आवर्तन सोडले जाणार आहे. धरणातून पाणी सोडले जात असल्याने, पाण्याच्या प्रवाहात उतरू नये, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

धरणातून सुरू करण्यात आलेला विसर्ग पुढील काही दिवस सुरूच राहणार असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नदीकाठावर राहाणाऱ्या मजुरांना गुरुवारी सायंकाळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, काठावर संसार थाटलेल्या राहुट्या काठापासून काही अंतरावर लागल्या आहेत.

--

सोमेश्वर धबधबा खळाळला

धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने सोमेश्वर येथील धबधबा पुन्हा वाहू लागला आहे. शनिवार आणि रविवार सुट्टीचे औचित्य साधून नाशिककर, तसेच नाशिकमध्ये आलेल्या पर्यटकांनी धबधबा पाहण्यासाठी गर्दी केली. कोरोनामुळे बंद असलेले मंदिरेही खुली झाल्याने सोमेश्वर परिसराला पुन्हा एकदा झळाली प्राप्त झाली आहे.