शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

बॉश एम्प्लॉईजच्या पदाधिकाऱ्यांवर अविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2016 00:15 IST

प्रतिसभेत नवीन ठराव : करार अंमलबजावणीवरून सर्वसाधारण सभेत गोंधळ

 नशिक : बॉश एम्प्लॉईज युनियन व व्यवस्थापन यांच्यात झालेल्या कराराची व्यवस्थापनाकडून अंमलबजावणी होत नसल्याचे सांगत युनियनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांविरोधात काही सभासदांनी गोंधळ घातल्याने अध्यक्ष हेमंत अहेर यांनी सभा गुंडाळली. दरम्यान, संतप्त कामगारांनी ज्येष्ठ कामगार सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिसभा घेत सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव मंजूर करून घेतला. या गोंधळामुळे युनियनमध्ये उभी फूट पडली असून, संघटनेमधील अंतर्गत वातावरण चिघळण्याचे संकेत मिळत आहे. दादासाहेब गायकवाड सभागृहात रविवारी सकाळी बॉश एम्प्लॉईज युनियनची सभा पार पडली. व्यासपीठावर अध्यक्ष हेमंत आहेर, जनरल सेक्रेटरी श्रीकृष्ण कुलकर्णी, उपाध्यक्ष आशिष शिंपी, नंदलाल आहिरे आदि उपस्थित होते. सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी कामगार हिताच्या मुद्द्यांची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप केला. काही सभासदांनी सर्वसाधारण सभेदरम्यान इतिवृत्ताचे वाचन सुरू असताना घोषणाबाजी करीत उपस्थित मुद्द्यांचा समर्पक खुलासा होत नसल्याचे सांगत व्यासपीठाभोवती घेराव घालून पदाधिकाऱ्यांच्या हातातील माईक घेण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ वाढला. त्यामुळे अध्यक्ष हेमंत अहेर यांनी सभा आटोपती घेतली.त्यानंतर विरोधी गटाने ज्येष्ठ कामगार सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसभा घेतली़ यावेळी नवे ठराव मंजूर करण्यात आले. यात विद्यमान पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, पूर्वीच्या करारांची अंमलबजावणी करावी, कामगारांशी संबंधित आर्थिक व्यवहार विद्यमान पदाधिकाऱ्यांसोबत करू नये, विद्यमान सभासदांबाबत अविश्वास असे ठराव करण्यात आले. विरोधी गटातील सभासदांतर्फे प्रवीण पाटील, प्रमोद भालेराव, गजेंद्र गुंजाळ, भाऊसाहेब बोराडे, माणिक बोडके, राजेंद्र देशमुख, सुरेश जाधव आदि उपस्थित होते. दरम्यान, विरोधकांकडे काहीच अजेंडा नव्हता, सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देत असतानाही विरोधकांनी मुद्दाम एकतर्फी गोंधळ घातल्याचे हेमंत अहेर यांनी सांगितले, तर सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर कामगारांचा विश्वास उरलेला नसल्याने त्यांनी नैतिकता दाखवून राजीनामे देऊन निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्याची मागणी विरोधी गटाने केल्याने आगामी काळात युनियनमधील अंतर्गत वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)