शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापन समित्या कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 00:47 IST

सायखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात कोरोना नियंत्रणासाठी गतवर्षी आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या होत्या. या समितीचे अध्यक्ष सरपंच तर सचिव म्हणून तलाठी कामकाज पाहत आहेत. या आपत्ती व्यवस्थापन समितीला सदस्यांनी राम राम ठोकल्याने खेडोपाडी गावागावात कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समित्या केवळ कागदावरच असून कोरोना रोखण्यासाठी पुन्हा ग्रामआपत्ती समित्यांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसायखेडा : निष्क्रिय समित्यांमुळे कोरोनाचा शिरकाव

सायखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात कोरोना नियंत्रणासाठी गतवर्षी आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या होत्या. या समितीचे अध्यक्ष सरपंच तर सचिव म्हणून तलाठी कामकाज पाहत आहेत. या आपत्ती व्यवस्थापन समितीला सदस्यांनी राम राम ठोकल्याने खेडोपाडी गावागावात कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समित्या केवळ कागदावरच असून कोरोना रोखण्यासाठी पुन्हा ग्रामआपत्ती समित्यांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.गतवर्षी ग्राम आपत्ती कमिटी स्थापन झाली. अनेक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कमिटीने उत्कृष्टरीत्या काम केले. कोरोनाचे संकट कमी झाले, परंतु पुन्हा कोरोनाने तोंड वर काढले आहे. त्यामुळे ग्राम आपत्ती समित्या कार्यान्वित करण्याची गरज आहे. अनेक गावांतून ग्राम आपत्ती समितीने चांगल्या प्रकारे काम केल्याने त्या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. परंतु ज्या गावांमध्ये ग्राम आपत्ती समिती कागदावरच राहिली अशा गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. बाहेरून येणारे नागरिक, बाहेर जाणारे नागरिक व गावातील व्यवस्था यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे कोरोनाचा शिरकाव झाला होता. या ग्राम आपत्ती समितीमध्ये अध्यक्ष सरपंच, सचिव तलाठी होते. तर कृषी साहाय्यक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश ग्राम आपत्ती समितीमध्ये आहे.समित्यांमध्ये सामाजिक तरुण कार्यकर्त्यांचा समावेश करून कोरोना नियंत्रणासाठी जनजागृती करणे, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स पाळणे, अशा उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी सर्वच नागरिकांनी काळजी अन‌् पुढाकार घेऊन पुन्हा ग्राम आपत्ती समित्या सक्रिय कराव्यात.- संदीप टर्ले, माजी सरपंच, चांदोरी (१५ आपत्ती व्यवस्थापन)

टॅग्स :talukaतालुकाcorona virusकोरोना वायरस बातम्या