शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गाळ उपसाबाबत दोन अधिकाऱ्यांत विसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 01:21 IST

भालूर धरणातला गाळ उपसण्यासाठी गेलेले जेसीबी व डंपर शुक्रवारी (दि.४) सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत धरण परिक्षेत्रात प्रांताधिकारी यांच्या आदेशावरून थांबविण्यात आले होते. मात्र, संबंधितांना तहसीलदारांनी परवानगी दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोन अधिकाऱ्यांमधील विसंवादाचे दर्शन यावेळी घडले.

ठळक मुद्देनांदगाव : भालूर धरणावर रंगले कारवाईचे नाट्य

नांदगाव :     भालूर धरणातला गाळ उपसण्यासाठी गेलेले जेसीबी व डंपर शुक्रवारी (दि.४) सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत धरण परिक्षेत्रात प्रांताधिकारी यांच्या आदेशावरून थांबविण्यात आले होते. मात्र, संबंधितांना तहसीलदारांनी परवानगी दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोन अधिकाऱ्यांमधील विसंवादाचे दर्शन यावेळी घडले.मिळालेल्या माहितीनुसार, प्रांत सोपान कासार यांनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडे  उभ्या असलेल्या वाहनांना अडवून गाळ काढण्याची परवानगीची कागदपत्रे मागितली. परंतु कागदपत्रे वाहनधारक दाखवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी तलाठी शिरसाठ यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान तहसीलदार उदय कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संबंधितांना गाळ उपसण्याची परवानगी दिली असल्याची माहिती दिली. तलाठीही परवानगीबाबत अनभिज्ञ गाळ उपसण्याची परवानगी तहसीलदार देतात. त्यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडून शिफारस आवश्यक असते. धरणातून गाळ काढण्याची परवानगी अनेक शेतकऱ्यांना देण्यात येत असते. गाळ केवळ शेतात वापरण्यासाठीच परवानगी दिली जाते. दरम्यान,  तहसीलदारांनी परवानगी दिली असेल तर त्याची माहिती प्रांतांना का देण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, पंचनामे करणारे  तलाठी शिरसाठ यांनासुद्धा अशी परवानगीची माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार