शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

शवविच्छेदन केंद्र नसल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 01:33 IST

लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात शवविच्छेदन केंद्राचे बांधकाम मंजूर होऊनही प्रत्यक्षात बांधकाम होत नसल्याने या सुविधेअभावी लासलगाव परिसरातील मृतदेह निफाड येथे न्यावे लागत आहेत. शासकीय अनास्थेमुळे मृतदेह वीस किलोमीटर अंतरावर निफाड येथे न्यावे लागतात. त्यात पैसा आणि होणारा वेळ यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्यास विलंब होतो.

ठळक मुद्देलासलगाव : मंजुरी मिळूनही बांधकाम होत नसल्याने नाराजी

लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात शवविच्छेदन केंद्राचे बांधकाम मंजूर होऊनही प्रत्यक्षात बांधकाम होत नसल्याने या सुविधेअभावी लासलगाव परिसरातील मृतदेह निफाड येथे न्यावे लागत आहेत. शासकीय अनास्थेमुळे मृतदेह वीस किलोमीटर अंतरावर निफाड येथे न्यावे लागतात. त्यात पैसा आणि होणारा वेळ यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्यास विलंब होतो.आमदार छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात असलेल्या या ग्रामीण रुग्णालय परिसरात होणारी कामे शासकीय अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे रखडली. त्याची माहिती समजताच या अधिकाऱ्यांना नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सूचना दिल्याचे समजते. लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मुबलक जागा पाहता परिसरात पोस्टमार्टेम रूम तसेच वैद्यकीय अधिकारी व चतुर्थ श्रेणी कामगार यांचे निवासस्थान बांधकाम करण्यास मुबलक जागा आहे. याबरोबरच लासलगाव येथील नळ पाणी योजनेचे पाणी साठविण्यासाठी जलकुंभ या विविध बांधकामे करण्यासाठी लासलगावच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने किमान दीड डझन पत्रे पाठविली गेली. या रुग्णालयाच्या परिसरात सुंदर बाग तयार करण्यात आली आहे तसेच बगीच्यात लहान मुलांना खेळायला खेळणीदेखील आहेत. येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.व्ही. सूर्यवंशी यांच्यासह सहकारी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना तपासून आंतररुग्ण सेवाही दिली जाते. लासलगाव येथून दोन किलोमीटर अंतरावर एकांतात हे रुग्णालय असले तरी आकस्मिक मृत्यू तसेच अपघात व दुर्घटना घडली तर पोलीस सोपस्कारानंतर लासलगाव परिसरातील मृतदेह वीस किलोमीटर अंतरावर निफाड येथे न्यावे लागतात. तातडीने शवविच्छेदन केंद्र काम होण्याची गरज आहे. लासलगावपासून दोन किलोमीटर अंतरावर हे रु ग्णालय असून, दहा ते अकरा शिपाई व इतर कर्मचारी, एक वैद्यकीय अधिकारी, सहायक अधिकारी निवास स्थान, कार्यालय अधिकारी यांची निवासस्थाने या बांधकामाची निकड आहे.या रुग्णालयात कर्मचारी यांच्या पदाची मंजुरी असून, फक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद रिक्त आहे, तसेच एमएसईबी पॅनल जळालेले आहे.लासलगाव परिसरात मृतदेहाचे पोस्टमार्टेम रूम होणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु शासकीय अधिकारी का दुर्लक्ष करीत आहे ?- जयदत्त होळकर,लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती