शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

फरशी पूल तुटल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 23:06 IST

मनमाड : शहरातील रामगुळणा पांझण नदीला आलेल्या पुरामुळे बुरकूलवाडी भागाकडे जाणारा फरशी पूल तुटल्याने या भागातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमनमाड : दुरुस्तीची मागणी; नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला; पावसाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : शहरातील रामगुळणा पांझण नदीला आलेल्या पुरामुळे बुरकूलवाडी भागाकडे जाणारा फरशी पूल तुटल्याने या भागातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.नुकतेच पांझण रामगुळणा नदीला आलेल्या पुरामुळे शहरात मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये एचएके हायस्कूलच्या मागच्या बाजूला शहरातून बुरकूलवाडी, कीर्तिनगर, सिकंदरनगर, माउलीनगर, डॉ. आंबेडकरनगर भागाला जोडणारा फरशी पूल तुटला आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या भागातून शहराकडे येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या पुलाची सध्या दुरवस्था झाली असून, प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून या पुलाची उंची वाढवून दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेनेचे शहर उपप्रमुख खालीद शेख, शरीफ राठोड, फिरोज खान, शब्बीर तांबोळी, नदिम शेख, जहीर शेख, रमेश खरे, राजेंद्र व्यवहारे, संजय बनकर, सुभाष साळवे, आरिफ शेख, अशोक चौधरी, मोहसीन शेख, असलम शेख आदी नागरिकांच्या स्वाक्षºया आहेत.मुख्यत: या भागातून एचएके हायस्कू लकडे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असतात. सध्या या पुलावर पाणी असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा फेरा मारून महामार्गाने यावे लागते. यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणFarmerशेतकरी