शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेपासून विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 01:44 IST

वडाळारोडवर सिनिअर प्रोफेसरच्या नेट परीक्षेला राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारण्यात आल्याने या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून मुंबई नाका पोलिसांना बोलावून या विद्यार्थ्यांची समजूत काढण्यात आली.

ठळक मुद्देउशीर झाल्याने गोंधळ : पोलिसांचा हस्तक्षेप

इंदिरानगर : वडाळारोडवर सिनिअर प्रोफेसरच्या नेट परीक्षेला राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारण्यात आल्याने या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून मुंबई नाका पोलिसांना बोलावून या विद्यार्थ्यांची समजूत काढण्यात आली.वडाळारोडवर १८ ते २१ डिसेंबरपर्यंत सिनिअर प्रोफेसर या पदाच्या नेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारपासून या परीक्षा सुरू असून, या परीक्षार्थींना सकाळी नऊ वाजेच्या पूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र या परीक्षेसाठी राज्याच्या विविध ठिकाणांहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचण्यास उशीर झाला. परीक्षा केंद्रावर पाच ते दहा मिनिटे उशीर झाल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास मज्जाव करण्यात आला होता.त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांजवळ फोटो, आधार कार्ड, हॉल तिकीट या गोष्टी नसल्याने या विद्यार्थ्यांनाही प्रवेश नाकारण्यात आला. ही परीक्षा आॅनलाइन पद्धतीने असल्याने यात कोणताही हस्तक्षेप करता येत नसल्याचे आयोजकांनी म्हणणे होते. प्रशासन या विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्यास ठाम असल्याने या विद्यार्थ्यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. अखेर मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांना पाचारण करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. ही परीक्षा आॅनलाइन असून याठिकाणी नियोजित वेळेनंतर विद्यार्थ्यांना सोडता येऊ शकत नाही. परीक्षा केंद्रावर सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. उशिरा आलेल्यांना सोडता येणार नाही, असे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी आमचे वर्ष वाया जाईल त्यामुळे ही संधी द्यावी, अशी विनंती केली. मात्र निर्णयात बदल करण्यात आला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून वंचित रहावे लागले.

टॅग्स :Nashikनाशिकexamपरीक्षा