शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

निफाड ते सिन्नर प्रवाशांची गैरसोय

By admin | Updated: February 18, 2016 22:46 IST

चक्री बस : पुण्याकडे जाण्यासाठी नाशिकमार्गे प्रवास

 निफाड : येथून सिन्नर येथे ये-जा करण्यासाठी पुरेशा बसेस नसल्याने दोन्ही तालुक्यांतील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. लासलगाव डेपो मॅनेजर यांनी याप्रश्नी लक्ष घालून निफाड ते सिन्नर अशी चक्री बस सुरू करण्याची मागणी निफाडच्या नागरिकांनी केली आहे.निफाड येथे प्रांत कार्यालय असून सिन्नर हे निफाड उपविभागात येते. त्यामुळे सिन्नरच्या नागरिकांना या कार्यालयात येण्यासाठी ये-जा करावी लागते. शिवाय चांदवड, पिंपळगाव (ब), धुळे, जळगावकडे जायचे असल्यास सिन्नरकरांना निफाडमार्गे जवळच्या मार्गाने जावे लागते. शिवाय निफाडच्या जनतेला पुणे, संगमनेरकडे जायचे असल्यास सिन्नरमार्गे जावे लागते. निफाड-सिन्नर हे भौगोलिकदृष्ट्या जोडून तालुके असल्याने दोन्ही तालुक्यातील नागरिकांची ये-जा सातत्याने चालू असते. गेली ३० वर्षे झाली. सिन्नर-चांदवड ही एकमेव बस निफाडला येण्यासाठी आहे. सदर बस सिन्नर-बारागाव पिंप्री, म्हाळसाकोरे, मांजरगाव, सायखेडा, चांदोरी, खेरवाडी, कसबे सुकेणे, निसाकामार्गे निफाडला अशा मोठ्या लांबच्या मार्गाने निफाडला सकाळी १०.१५ ला येते. मग चांदवडला जाते हीच बस परत चांदवडहून सिन्नरला जाण्यासाठी दुपारी १.३० ला निफाडला येते. परंतु निफाडला कुणीही प्रवासी परत वरील लांबच लांब मार्गाने या बसने सिन्नरकडे जात नाही, त्यापेक्षा खासगी वाहनाने नागरिक सिन्नरला जाणे पसंत करतात. निफाड-कोठुरे-करंजगाव-मांजरगाव, म्हाळसाकोरे, सिन्नरचे निमगाव, बारागाव पिंप्री हा मार्ग सर्वात जवळचा, सोईचा, वेळेची बचत करणारा आहे. याच मार्गावरून निफाड-सिन्नर ही फेरा बस सुरू करावी. दिवसभरात या बसचे चार फेरे केल्यास दोन्ही तालुक्यांतील प्रवाशांचा गंभीर प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील पश्चिम आणि उत्तर भागातील जनतेची सिन्नरकडे ये-जा करण्याची समस्या दूर होईल.यापूर्वी लासलगाव डेपो मॅनेजर यांच्याकडे निफाडकरांनी निफाड-सिन्नर फेरा बस सुरू करण्याची मागणी केलेली आहे; मात्र डेपो प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.गेल्या पाच-सहा वर्षांपासून जनतेच्याच रेट्यामुळे पुण्याला जाणाऱ्या विद्यार्थी, व्यापारी वर्गासाठी लासलगाव पुणे ही बस निफाड-सिन्नरमार्गे सुरू करण्यात आली. ती बस निफाडला सकाळी ६.३० ला येते. या बसला प्रवाशांचा प्रतिसाद आहे. कधीकधी बस पुणे प्रवाशांनी भरल्याने बऱ्याच प्रवाशांना या बसने जाता येत नाही. सिन्नरला जाण्यासाठी दिवसभर बसच नसल्याने उरलेल्या प्रवाशांना मग नाशिकला जाऊन मग पुण्याकडे बसने प्रयाण करावे लागते. (वार्ताहर)