शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाहन नोंदणी कॅँप स्थलांतरामुळे गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:23 IST

सटाणा : गेल्या तीन ते चार दशकांपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे येथील ताहाराबाद रोडवरील शासकीय विश्रामगृह आवारात वाहन नोंदणी कॅम्प घेतला जात होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या कॅम्पचे स्थलांतर करून शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नाशिक रस्त्यावरील चिनार या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात भरविला जात आहे.यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत असून, हा ...

ठळक मुद्देसटाणा : शहराबाहेर जावे लागत असल्याने नागरिकांत संताप

सटाणा : गेल्या तीन ते चार दशकांपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे येथील ताहाराबाद रोडवरील शासकीय विश्रामगृह आवारात वाहन नोंदणी कॅम्प घेतला जात होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या कॅम्पचे स्थलांतर करून शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नाशिक रस्त्यावरील चिनार या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात भरविला जात आहे.यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत असून, हा वाहन नोंदणी कॅम्प पूर्वीच्याच ठिकाणी घेण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना साकडे घातले. राजेंद्र सोनवणे यांनी विभागाचे मोटार वाहन निरीक्षक जमीर तडवी व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सौ.एम.एम. चौधरी यांना येथील चिनार विश्रामगृहावर साकडे घालून आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. अशा परिस्थितीत शहरापासून चार किलोमीटर अंतरावर वाहन नोंदणीसाठी भर उन्हात उभे राहवे लागत आहे. यामुळे वाहनधारकांची हेळसांड होत असल्याचे निवेदनात नमूद करून वाहन नोंदणी कॅम्प पूर्वीच्याच जागी घेण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात वाहन नोंदणी कॅम्पचे आयोजन केले जात होते. मात्र जागा अपुरी पडत असल्याचे कारण दाखवित या कॅम्पचे स्थलांतर शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील नाशिक रस्त्यावरील चिनार विश्रामगृहजवळ केले आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातून वाहन नोंदणीसाठी येणाºया नागरिकांना शहराबाहेर जाण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. याशिवाय येथे पिण्याच्या पाण्याचीदेखील सुविधा नसल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.