इंदिरानगर : वडाळागावात अनियमित येणाऱ्या घंटागाडीमुळे घाण व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तातडीने घंटागाडी नियमित करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.मोकाट जनावरे मुक्त संचार करीत असल्याने केरकचरा पसरल्याने परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. घाण व दुर्गंधीमुळे साथीच्या आजाराची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तातडीने परिसरात घंटागाडी नियमित करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने दादा हाजी, फिरोजी हाजी, रफीक शेख, इम्रान शेख, शेबाज शहा, सलाम खान यांच्यासह नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
वडाळागाव परिसरात घाणीचे साम्राज्य
By admin | Updated: September 27, 2016 01:43 IST