शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सरळसेवेने नियुक्त अधिकाऱ्यांचा गावात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 00:48 IST

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे सरळसेवेत नियुक्त झालेल्या गट-अ अधिकाऱ्यांच्या ५५ जणांची तुकडी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये राहून जिल्हा प्रशासकीय आणि पंचायत राज कामांचा अनुभव घेणार आहे. या प्रशिक्षणात उमेदवार गावाच्या परंपरेपासून ते शासकीय योजनांचा अभ्यास करणार आहे.

ठळक मुद्देप्रशिक्षण कार्यक्रम : ५५ उमेदवारांच्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे सरळसेवेत नियुक्त झालेल्या गट-अ अधिकाऱ्यांच्या ५५ जणांची तुकडी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये राहून जिल्हा प्रशासकीय आणि पंचायत राज कामांचा अनुभव घेणार आहे. या प्रशिक्षणात उमेदवार गावाच्या परंपरेपासून ते शासकीय योजनांचा अभ्यास करणार आहे.लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवेने नियुक्त झालेल्यांसाठी पुण्याच्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्र म आयोजित केला जातो. दोन वर्षांचे हे प्रशिक्षण प्रत्यक्ष कार्यानुभवावर आधारित असून, त्यामध्ये एक आठवड्यात ग्रामीण भागातील प्रशिक्षण व आदिवासी भागातील गाव प्रशिक्षण यांचा समावेश असतो. त्यानुसार नाशिक जिल्ह्णात ५५ परिविक्षाधीन अधिकारी दाखल झाले असून, ते जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आठवडाभर मुक्कामी राहून अभ्यास करणार आहेत. या अधिकाºयांना दिलेल्या गावात तेथील जनजीवन, संस्कृती, आहार-विहार, नैसर्गिक, भौगोलिक परिस्थिती आणि शासकीय योजनांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यानुसार दि. २३ ते २९ या कालावधीत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रायते, बोरीपाडा, इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते, शेणवड, सुरगाणा तालुक्यातील माणी, खुंटविहीर आणि कळवण तालुक्यातील चणकापूर, मोहनदरी तसेच खर्डे दिगर या गावांमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी अभ्यास करणार आहेत.परीविक्षाधीन अधिकाºयांमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, सहायक गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे.अखिल भारतीय सेवेतील अधिकाºयांच्या प्रशिक्षणासाठी ज्याप्रमाणे कार्यक्र म राबविला जातो त्याचप्रमाणे गाव भेटीतील कार्यक्र मांची आखणी करण्यात आलेली आहे. दिलेल्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी संबंधित गावचे तलाठी व ग्रामसेवक यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.राज्यात १५२ प्रशिक्षणार्थीलोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा परीक्षेद्वारे सरळसेवेने नियुक्त झालेल्या गट-अ अधिकाºयांसाठी पुणे येथील यशदामध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षणासाठी सध्या १५२ प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत. दोन वर्षांच्या या अभ्यासक्र मात गावागावात जाऊन जीवनशैलीचा अभ्यास करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात ५५ प्रशिक्षणार्थी सोमवारी रवाना झाले आहेत. तत्पूर्वी त्यांना अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक