शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचारी संघटनेची राज्यपालांकडे धाव आरोग्य विद्यापीठ : संघटनेचे अध्यक्ष डी. एल. कराड यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:30 IST

महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगार संघटनेचे तेराव्या दिवशी आंदोलन सुरूच असून, याप्रकरणी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे निवेदन सादर करून कंत्राटी कर्मचाºयांना न्याया द्यावा, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देसमान वेतन दिले जात नाहीमहत्त्वाच्या विभागांमध्ये जबाबदारीची कामे

नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगार संघटनेचे तेराव्या दिवशी आंदोलन सुरूच असून, याप्रकरणी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे निवेदन सादर करून कंत्राटी कर्मचाºयांना न्याया द्यावा, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी राज्यपाल कार्यालयाने तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे कराड यांनी निवेदनात म्हटले आहे.निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सुमारे ३५० ते ४०० कंत्राटी कामगारांना तुटपुंजे म्हणजेच ६ ते ७ हजार रुपये इतकाच मोबदला दिला जातो. विद्यापीठातील नियमित कर्मचाºयाप्रमाणे कंत्राटी कर्मचारी काम करीत असतानाही त्यांना समान वेतन दिले जात नाही. या कर्मचाºयांना केवळ २६ दिवसदेखील काम दिले जात नाही. असे असतानाही गेली अनेक वर्षे हे कर्मचारी नियमित कर्मचाºयांप्रमाणे महत्त्वाच्या विभागांमध्ये जबाबदारीची कामे सांभाळत आहेत. मात्र नियमित कर्मचाºयांना १८००० ते २४००० इतके वेतन दिले जाते. सर्वाेच्च न्यायालयाने यासंदर्भात निकाल दिलेला आहे. त्यानुसार कंत्राटी कर्मचाºयांनादेखील १८००० ते २४००० इतके वेतन देणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु विद्यापीठ प्रशासन मात्र समान कामाला समान दाम देत नाही. याउलट कर्मचाºयांसाठी न्याय मागितला म्हणून विद्यापीठाने नऊ कर्मचाºयांना कामावरून कमी केले आहे. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांपासून ते कुलगुरू, कुलसचिव यांच्यापर्यंत न्याय मागितला आहे. मात्र कंत्राटी कर्मचाºयांना अद्याप न्याय मिळू शकलेला नाही. त्यामुळे राज्यपालांना साकडे घालण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे...तर राजभवनावर मोर्चामहाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठ कंत्राटी कामगार संघटनेने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने अनेक प्रयत्न केले, चर्चा केली, निवेदने दिली; मात्र विद्यापीठाकडून दाद दिली जात नाही. शिवाय कामगार आयुक्त, कामगार न्यायालयाची दिशाभूल करीत असल्याने राज्यपालांकडे दाद मागण्यात आली आहे. लोकशाही मार्गाने न्याय न मिळाल्यास पुढील आठवड्यात राजभवनावर मोर्चा काढला जाईल, असे डॉ. डी. एल. कराड यांनी निवेदनात म्हटले आहे.