शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी धोरणात्मक निर्णयाबाबत संचालकच अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:52 IST

तब्बल २८० कोटी रुपयांचे स्काडा मीटर खरेदी करण्यासाठी काढलेल्या निविदेतील परस्पर फेरबदल हा वादाचा मुद्दा ठरल्यानंतर सीईओ प्रकाश थविल यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याचे मानले जात असून, त्यामुळे गोंधळ वाढला आहे.

ठळक मुद्देस्काडा मीटर प्रकरण : थविल यांच्या आरोपामुळे वाढला गोंधळ

नाशिक : तब्बल २८० कोटी रुपयांचे स्काडा मीटर खरेदी करण्यासाठी काढलेल्या निविदेतील परस्पर फेरबदल हा वादाचा मुद्दा ठरल्यानंतर सीईओ प्रकाश थविल यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याचे मानले जात असून, त्यामुळे गोंधळ वाढला आहे. मीटर खरेदी प्रकरणात परस्पर बदल करणे ही धोरणात्मक बाब असून, त्याबाबत संचालकच अंधारात असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना परस्पर धोरण बदलाचा अधिकार कोणी दिला? असा थेट प्रश्नच काही संचालकांनी मंगळवारी (दि.१०) उपस्थित केला आहे.संपूर्ण शहरात अचूक आणि अत्याधुनिक पद्धतीने जलमापन करण्यासाठी नाशिकस्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून दोन लाख स्काडा मीटर खरेदी करण्यात येणार आहेत. दोन वेळा निविदेला मुदतवाढ दिल्यानंतर ज्यावेळी निविदा भरण्याची तीन दिवसांची मुदत होती, त्यावेळी निविदेत अनेक फेरबदल शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात आल्याने हा वादाचा विषय ठरला होता. विशिष्ट कंपनीला डोळ्यासमोर ठेवून हे सर्व बदल करण्यात आल्याचा संशय कंपनीच्या संचालक असलेल्या महापालिका पदाधिकाºयांना होता. त्यामुळे कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार गेल्यानंतर त्यांनी आधी निविदेला स्थगिती दिली आणि नंतर ती निविदाच रद्द केली. त्यानंतर संचालकांच्या तक्रारींमुळे थविल यांची गच्छंती करण्याची वेळ आली असतानाच त्यांनी कंपनीची बदनामी होत असल्याचे निमित्त करून मीटर खरेदी प्रकरणाचा खुलासा केला आहे. त्यात कंपनीचे अध्यक्ष सीतराम कुंटे यांच्या संमतीने बदल झाल्याचे सांगून त्यांनाच एकप्रकारे वादात ओढले आहे.यासंदर्भात कंपनीचे संचालक तथा महापालिकेतील विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते, शाहू खैरे आणि गुरुमित बग्गा यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न केले.मीटर खरेदी प्रकरणात अचानक बदल केल्याची तक्रार आमदार फरांदे यांनी सीताराम कुंटे यांच्याकडे तक्रार केली आणि त्यानंतर त्यांनीच निविदा रद्द केली. त्यानंतरही निविदेतील बदल हे कुंटे यांच्या सहमतीनेच झाल्याचा दावा थविलकरीत असतील तर मग कुंटे यांनी निविदा का रद्द केली त्याचे उत्तर कुंटे हेच देऊ शकतील; मात्र मीटर तीन टप्प्यांत बसविणे म्हणजे निविदेचे तुकडे करणे असते, असा टोला या संचालकांनी लगावतानाच असे धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार थविल यांनी कसे काय वापरले, असा प्रश्न त्यांनी केला.तेव्हा कंपनीची बदनामी झाली नव्हती का?स्काडा प्रकरणात थविल यांच्या विरोधात तक्रारी झल्यानंतर त्यांनी कंपनीची बदनामी होत असल्याचा आरोप करून खुलासा केला असल्याचे नमूद केले आहे; मात्र त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा अवघा एक किलोमीटरचा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही, त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, अशावेळी कंपनीची बदनामी होत नाही काय? फुले कलादालनाच्या छताचा भाग मध्यंतरी पडला. असे निकृष्ट काम असूनही त्या ठेकेदाराला आणखी पन्नास लाख रुपये ज्यादा देण्याचा प्रस्ताव मांडला जातो, ती कंपनीची बदनामी नाही काय? असा प्रश्न बोरस्ते, खैरे आणि बग्गा यांनी केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकSmart Cityस्मार्ट सिटी