सिन्नर : पोलिसांचे गाव अशी ओळख मिळविलेल्या तालुक्यातील पास्ते या गावातील बहुसंख्य ग्रामस्थ मुंबई तसेच वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस खात्यात विविध पदांवर कार्यरत आहेत. नुकतेच या गावास महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्यासह भेट दिली.शिर्डी येथूून मुंबईकडे परत येत असताना त्यांच्या गाडीवर चालक असलेले पोलीस शिपाई राजू घुगे यांनी पास्ते या आपल्या गावाला भेट देण्याची विनंती केली. पडसळगीकर यांनीही लागलीच घुगे यांच्या विनंतीला मान दिला. पडसळगीकर यांच्यासह नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक दोरजे व सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घुगे यांच्या घरी भेट दिली.याप्रसंगी सरपंच गोरख हांडे, नवनाथ घुगे, सुनील आव्हाड, विनायक आव्हाड, शरद कुटे, शांताराम आव्हाड, वसंत आव्हाड, दामोधर उगले, रामचंद्र घुगे, शिवाजी घुगे, बबन आव्हाड, रोहिदास घुगे, रामदास घुगे, रामेश्वर आव्हाड, आकाश आव्हाड, निखिल आव्हाड आदी उपस्थित होते.
पोलीस महासंचालक पडसळगीकर यांची पास्ते गावास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 17:43 IST
सिन्नर : पोलिसांचे गाव अशी ओळख मिळविलेल्या तालुक्यातील पास्ते या गावातील बहुसंख्य ग्रामस्थ मुंबई तसेच वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस खात्यात विविध पदांवर कार्यरत आहेत. नुकतेच या गावास महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्यासह भेट दिली.
पोलीस महासंचालक पडसळगीकर यांची पास्ते गावास भेट
ठळक मुद्दे पास्ते गावातील १७० युवक पोलीस खात्यात कार्यरत असून, १५ ते २० पोलीस खात्यात विविध पदांवर कार्यरत असल्याची माहिती उपसरपंच शरद आव्हाड यांनी दिली. ही बाब गावच्या दृष्टीने कौतुकास्पद असल्याचे गौरवाद्गार पडसळगीकर यांनी काढले.