शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

थेट जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 01:09 IST

गंगापूर धरणातून थेट नाशिकरोड व गांधीनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी शनिवारी सकाळी गंगापूर गावानजीकच्या कानेटकर उद्यानाजवळ एका अज्ञात जेसीबीचालकाने तोडल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.

गंगापूर : गंगापूर धरणातून थेट नाशिकरोड व गांधीनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी शनिवारी सकाळी गंगापूर गावानजीकच्या कानेटकर उद्यानाजवळ एका अज्ञात जेसीबीचालकाने तोडल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. शिवाय शहरातील पंचवटीसह काही भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला. सदरची मुख्य जलवाहिनी असल्यामुळे सुमारे ५० फुटाहून उंच पाण्याचा फवारा उडून पाण्याचा अपव्यय झाला. महापालिकेला याची माहिती मिळाल्यावर अधिकाऱ्यांनी तत्काळ मुख्य पाण्याचा विसर्ग थांबवून दुरुस्तीचे काम हाती घेतले.सुला वाइन आणि कानेटकर उद्यानाकडे जाणाºया रस्त्यावरील पाटामधून गेलेल्या एक मीटर व्यासाच्या मुख्य लाइनमधील व्हॉल्व्ह शनिवारी सकाळी अज्ञात जेसीबीचालकाने तोडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाखो लिटर पाणी वाया गेले.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी या ठिकाणी परिसरात बांधकामाचे काम करण्यासाठी आलेल्या जेसीबीच्या चालकाने मुद्दामहून या मुख्य जलवाहिनीला जेसीबीच्या धडकेने व्हॉल्व्ह तोडला. त्यानंतर तत्काळ त्याने तेथून पळ काढला. मुख्य जलवाहिनी असल्याकारणाने आकाशात उंच पाण्याचा फवारा उडू लागल्याचे पाहून नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले. या घटनेची माहिती महापालिकेला कळविण्यात आल्यावर महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंत्याने धाव घेतली. थेट गंगापूर धरणातून जलवाहिनीला पाणीपुरवठा होत असल्याने गंगापूर धरणातूनच पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आल्यावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार पाण्याच्या प्रेशरने फुटला असावा. मुख्य जलवाहिनीतून अनधिकृतपणे नळजोडणी घेऊन पाण्याची चोरी केली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये यापूर्वीच प्रसिद्ध झाले होते. परंतु त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. त्यामुळे सदरचे बांधकाम नक्की कोणाचे आणि त्याकडे दुर्लक्ष का केले गेले असा प्रश्न केला जात आहे.सकाळी या ठिकाणाहून जात असताना एक जेसीबी मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हजवळ उभा होता. थोड्या वेळात व्हॉल्व्ह तुटल्याचा जोरदार आवाज झाला व पाण्याचा उंच फवारा उडाला. त्यामुळे जेसीबीचालकाने घाबरून तेथून पळ काढला.- चंद्रकांत राऊत, प्रत्यक्षदर्शीएक मीटर व्यासाची पाण्याची जलवाहिनी असल्याने यामध्ये पाण्याचा मोठा प्रेशर तयार होतो. व्हॉल्व्हमधून हवा पास होत नसल्याने तो तुटला आहे. या जलवाहिनीतून नाशिकरोड आणि उपनगर विभागाला थेट पाणीपुरवठा करते. त्यामुळे प्रेशर वाढल्याने कदाचित व्हॉल्व्ह तुटला असावा.शिवाजी चव्हाणके, अधीक्षक अभियंता, मनपा

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी