शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

अंकाई-टंकाई किल्ल्यावर दीपोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:19 IST

जळगाव नेऊर : गुलामगिरीच्या अंधकारात खितपत पडलेल्या रयतेला स्वराज्याचा प्रकाश देत तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत पराक्रमी मावळ्यांच्या चरणी मुजरा करण्यासाठी ह्यस्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराच्याह्ण वतीने ह्यएक पणती दुर्गालाह्ण या उपक्रमाअंतर्गत येवला तालुक्यातील अंकाई-टंकाई किल्ल्यावर रविवारी (दि.१५) सायंकाळी असंख्य शिलेदारांच्या सोबतीने दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देस्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराचा अनोखा उपक्रम

जळगाव नेऊर : गुलामगिरीच्या अंधकारात खितपत पडलेल्या रयतेला स्वराज्याचा प्रकाश देत तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत पराक्रमी मावळ्यांच्या चरणी मुजरा करण्यासाठी ह्यस्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराच्याह्ण वतीने ह्यएक पणती दुर्गालाह्ण या उपक्रमाअंतर्गत येवला तालुक्यातील अंकाई-टंकाई किल्ल्यावर रविवारी (दि.१५) सायंकाळी असंख्य शिलेदारांच्या सोबतीने दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.परिवाराच्या वतीने सण-उत्सव हे मराठ्यांच्या शौर्यशाली पराक्रमाची साक्षीदार असणाऱ्या दुर्गावरती साजरा करण्यात येतात. या वर्षीचा दुर्ग दीपोत्सवाची सुरुवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वती खबरदारी घेत नाशिक प्रभागाचे श्याम गव्हाणे यांच्या हस्ते गडदेवतेचे पूजन करून करण्यात आले.यावेळी पेशवेकालीन सतीमाता मंदिर, लक्ष्मी-माता मंदिर व अंकाई लेणी परिसर, टंकाई येथील पुरातन महादेव मंदिर येथे दिवे प्रज्वलित करण्यात आले, तर लेणी परिसरातील शिवराय मूर्तिपूजन बाळासाहेब झाल्टे यांच्या हस्ते पार पडले.किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला आकाशकंदील, फुलांचे तोरण आणि पणत्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. प्रवेशव्दाराजवळील शिवरायांचे विधिवत मूर्ती पूजन बालशिलेदार साई आरगडे, अनिकेत जाधव आणि बाल शिवव्याख्याते ओमकार थोरात यांच्या हस्ते पार पडले. भगव्या भंडाऱ्याची उधळण, कुणाल तळेकरच्या शिवगर्जनेने आणि शिव घोषाने अंकाई-टंकाई परिसर निनादून निघाला होता. तेज आर्ट क्रिएशनच्या संचालक अर्चना शिंदे, तेजस्विनी शिंदे आणि शुभम बेळे यांनी आकर्षक रांगोळी काढली होती.यावेळी शिवव्याख्याते प्रा. दीपकराजे देशमुख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हा दीपोत्सव सोहळा म्हणजे तिमिराकडून तेजाकडे नेणारा, नवचैतन्य निर्माण करणारा आहे. दिवाळीच्या पर्वात आपण अभ्यंगस्नान करतो, अभंग्यस्नानमुळे बाह्यअंग साफ होते; पण आपलं अंतकरण ही शुद्ध होणं गरजेचं आहे. यासाठी आपण शिवरायांच्या चरणी एक पणती लावताना त्याग, समर्पण आणि शुद्ध आचारणाची शपथ प्रत्येकाने घेतली पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयातील तो दिवा अजूनही पेटला नाही, जेव्हा तो शिवविचाराच्या शिवतेजाने पेटेल तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने आपला दीपोत्सव साजरा होईल.दीपोत्सवास सोमनाथ गव्हाणे, विजय महाले, सुनील बोराडे, नाना जाधव, स्वप्निल वाळुंज, किरण कापसे, समाधान कदम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :FortगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज