शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

दिंडोरीच्या कोरोनाबाधित डॉक्टरचा आरोग्य केंद्राच्या पथकाशी वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 18:14 IST

दिंडोरी : दिंडोरीच्या एका प्रतिष्ठित उच्च शिक्षति डॉक्टरकडून कोरोना बाधित रु ग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटूंबीयातील व्यक्तींची माहिती ...

ठळक मुद्देपोलिसात गुन्हा दाखल

दिंडोरी : दिंडोरीच्या एका प्रतिष्ठित उच्च शिक्षति डॉक्टरकडून कोरोना बाधित रु ग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटूंबीयातील व्यक्तींची माहिती संकलित करण्यासाठी घरी आलेल्या आरोग्य सेवक, आशा प्रवर्तक यांना शिविगाळ करु न अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार शिवाजीनगर भागात घडला. याप्रकरणी दिंडोरी पोलिसात डॉक्टर व आई विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिंडोरीच्या शिवाजीनगर भागत राहणारे एक डॉक्टर यांना कोरोनाची लागण होवून त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझििटव्ह आल्याने डॉक्टर व त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्तींची कंटेंटमेंट झोन तयार करण्यासाठी माहिती संकलित करण्यासाठी डॉक्टरांच्या शिवाजीनगर येथे असलेल्या निवासस्थानी आरोग्य सेवक ए. ए. सय्यद, राजेंद्र जगताप, गट प्रवर्तक ज्योती जाधव, आशा कार्यकर्ती अिश्वनी गांगुर्डे हे गेले असता डॉक्टरने अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला. व परत घराकडे फिरकले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर डॉक्टरांच्या आईने आपटून आत्महत्या करण्याची धमकी देत आरोग्य सेवकांना माघारी परतण्याचे सांगत आरडाओरड केली. तळेगाव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र दोनचे आरोग्य सेवक अमजद अहेमद सय्यद राहणार पखालरोड, जुने नाशिक यांच्या फिर्यादीवरून दिंडोरी पोलिसांनी कोरोना विषाणु संदर्भात महाराष्ट्र शासनाने, पोलिस प्रशासन व जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशांचे उल्लंघन, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करु न हयगय व बेदरकापणे मानवी जिवीतास व याक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करु न कोरोना संसर्ग पसरविण्याची हयगईची व घातक कृती करु न शासनाचा विविध आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरांचे निवासस्थान व हॉस्पिटल परिसर सील करण्यात आले असुन परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. पुढील तपास दिंडोरी पोलिस करत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर