शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: चौथ्या फेरीत भारती पवार यांची मुसंडी; महाले यांना ३९ हजार मतांनी टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 12:36 IST

चौथ्या फेरीत १ लाख ४ हजार ४५३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ६५ हजार ९७ मतं पडली आहेत. पहिल्या फेरीत महाले आघाडीवर होते.

ठळक मुद्देधनराज महाले यांच्या पारड्यात ६५ हजार ९७ मतं पडली

दिंडोरी : गेल्या तीन निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा राहिलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले आहे. पवार यांची लढत माजी आमदार धनराज महाले यांच्याशी होत आहे. तसे पाहिले तर भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार यंदा आयात केले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात राहतो की राष्ट्रवादीचा कब्जा होतो, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून, दिंडोरीत दुसऱ्या फेरीपासून फेरीनंतर भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून चौथ्या फेरीत १ लाख ४ हजार ४५३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ६५ हजार ९७ मतं पडली आहेत. पहिल्या फेरीत महाले आघाडीवर होते; मात्र त्यानंतर ते मोठ्या फरकाने मागे पडले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण सतरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीमध्ये नाशिकपेक्षा अधिक ६५ टक्के इतके मतदान दिंडोरीत झाले. गेल्या निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांना ५ लाख ४२ हजार ७८४ मतं मिळाली होती, तर डॉ. भारती पवार यांना२ लाख ९५ हजार १६५ मतं मिळाली होती. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNashikनाशिकdindori-pcदिंडोरी