शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

दिंडोरीत ९१ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: December 28, 2015 22:58 IST

नगरपंचायत निवडणूक : शेवटच्या दिवशी २३ उमेदवारांची माघार

दिंडोरी : नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत २३ उमेदवारांनी माघार घेतली असून, १७ जागांसाठी तब्बल ९१ उमेदवार रिंगणात आहेत.विद्यमान सरपंच छबाबाई वाघ, माजी सरपंच व विद्यमान सदस्य विजयबापू देशमुख, आनंदा कराटे, विद्यमान सदस्य किशोर रेहरे, परशराम कराटे, जयवंता धामोडे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे, तर युवक कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील आव्हाड आदिंनी माघार घेतली. नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीसाठी १७ प्रभागांतून ११५ उमेदवारांनी १५४ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला होता. निवडणूक निरीक्षक रघुनाथ गावडे, निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश भोगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांच्या उपस्थितीत माघारी प्रक्रिया पार पडली. एकूण ११४ उमेदवारांपैकी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत २३ अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मात्र तब्बल ४० अपक्ष उमेदवारांनी माघार न घेता स्वबळ अजमावण्याचा निर्णय घेतल्याने अनेक प्रभागात बहुरंगी लढती रंगणार आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी काही अपक्ष उमेदवारांना पक्षीय उमेदवारांनी माघारीसाठी गळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच ज्या उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती त्या पक्षाच्या नेत्यांनीही माघारीसाठी प्रयत्न केले; परंतु अनेक उमेदवारांनी आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आपली उमेदवारी कायम ठेवली. शिवसेना १६, भाजपा १४, कॉँग्रेस १०, राष्ट्रवादी ६, मनसे ३, तर माकप २ जागा लढवत असून, ४० अपक्ष रिंगणात आहेत.प्रभाग-१ मधून गोरख पवार यांनी माघार घेतली असून, येथे आता चार पक्षीय उमेदवारांबरोबर पाच अपक्ष असे एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग-२ मधून रचना विक्रमसिंह राजे यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व एक अपक्ष अशी चौरंगी लढत रंगणार आहे. प्रभाग-३ मध्ये सुनील आव्हाड, सचिन आव्हाड, कैलास देशमुख यांनी माघार घेतली असून, आता पक्षीय तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग-४ मधून सोनाली मनोजकुमार पगारे यांनी माघार घेतली असून, पक्षीय तिरंगी लढत रंगणार आहे. प्रभाग-५ मधून तीन पक्षीय उमेदवारांबरोबर तीन अपक्ष अशी षटकोनी लढत रंगणार आहे. प्रभाग-६ मधून रोहिणी परशराम कराटे यांनी माघार घेतली असून, चार पक्षीय उमेदवारांसह दोन अपक्ष अशी षटकोनी लढत होणार आहे. प्रभाग-७ मध्ये प्रीतम देशमुख यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व एक अपक्ष अशी चौरंगी लढत रंगणार आहे. प्रभाग-८मध्ये घनश्याम चव्हाण, प्रमोद देशमुख यांनी माघार घेतली असून, दोन पक्षीय उमेदवार व चार अपक्ष अशी षटकोनी लढत रंगणार आहे. प्रभाग-९ मधून कार्तिकी अरुण गायकवाड यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व चार अपक्ष अशी सप्तरंगी लढत रंगणार आहे.प्रभाग-१० मध्ये छाया धोंडीराम जाधव यांनी माघार घेतली असून, दोन पक्षीय व एक अपक्ष अशी तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग-११ मध्ये जयेश श्याम गवारे यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व पाच अपक्ष अशी अष्टकोनी लढत होणार आहे. प्रभाग-१२ मध्ये पुष्पा रमेश जाधव, अर्चना प्रवीण सोनवणे यांनी माघार घेतली असून, येथे दोन पक्षीय व एक अपक्ष अशी तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग-१३ मध्ये संतोष पगार, दत्तात्रेय शिंदे, दीपक जाधव यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व तीन अपक्ष यांच्यात षटकोनी लढत रंगणार आहे. प्रभाग १४ मधून कुणीही माघार घेतली नसून दोन पक्षीय व दोन अपक्ष यांच्यात चौरंगी लढत होत आहे. प्रभाग-१५ मधील आनंदा कराटे यांनी माघार घेतली असून, पक्षीय पाच व तीन अपक्ष अशी अष्टकोनी लढत होत आहे. प्रभाग १६ मधून कुणीही माघार घेतली नसून तीन पक्षीय व एक अपक्ष अशी चौरंगी लढत होत आहे, तर प्रभाग-१७ मधून राधिका श्यामराव फसाळे यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व एक अपक्ष अशी चौरंगी लढत रंगणार आहे. दरम्यान, आज मंगळवार रोजी निशाणी वाटपानंतर प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होणार असून, अधिकृत माघारीची वेळ जरी संपली असली तरी काही अपक्षांची मनधरणी करत जाहीर पाठिंबा घेण्यासाठी काही उमेदवारांची धडपड सुरू आहे. (वार्ताहर)