लोहोणेर : व्यसन मुक्तीचे प्रणेते स्व. शेषराव महाराज पुण्यतिथीनिमित्त जामले (ता. धरमपूर, गुजरात) येथून निघणाऱ्या दिंडीचे उद्या (दि. २७) लोहोणेर येथे आगमन होत आहे.गुजरात राज्यातील (धरमपूर) येथून भाविक पायी दिंडीने शिरपूर येथे जात असतात. शुक्रवारी (दि.२७) रोजी सदर दिंडी लोहोणेर येथे मुक्कामी येत आहे. शनिवारी पहाटे ५ वाजता शिरपूरकडे प्रस्थान करणार असून, या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन व्यसनमुक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ.संजय महाजन, जगन पवार, अण्णा मिस्तरी, सुरेश पवार, प्रशांत आहेर, दिलीप सूर्यवंशी, रामा आहिरे, दत्तू जाधव आदिंनी केले आहे. (वार्ताहर)
लोहोणेर येथे दिंडीचे आगमन
By admin | Updated: September 26, 2014 23:43 IST