शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल परवानग्यांनी उद्योग, व्यापारात सुलभता आणावी - देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 19:38 IST

अर्थ चक्र फिरविण्यासाठी व्यापार व उद्योग सुरू करावेच लागतील. तेव्हा सर्व विचार व समन्वय साधून डिजिटल पद्धतीने सर्व परवाने विनाविलंब देऊन व्यापार व उद्योग क्षेत्रात सुलभता आणावी लागेल, असे मत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. 

ठळक मुद्देअर्थ चक्र फिरविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न आवश्यक डिजिटल परवानग्या देऊन व्यापार व उद्योग सुरू करावे महाराष्ट्र चेंबरच्या चर्चासत्रात देवेंद्र फडणवीस यांचे मत

नाशिक : कोरोनाला घाबरून कायमचे घरात बसता येणार नाही. अर्थ चक्र फिरविण्यासाठी व्यापार व उद्योग सुरू करावेच लागतील. तेव्हा सर्व विचार व समन्वय साधून डिजिटल पद्धतीने सर्व परवाने विनाविलंब देऊन व्यापार व उद्योग क्षेत्रात सुलभता आणावी लागेल, असे मत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांच्या समस्यांविषयी मंथन करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सतर्फे घेण्यात येत असलेल्या चर्चासत्रात त्यांनी उद्योजक व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, एमएसएमई हे विशेष महत्त्वाचे क्षेत्र असून, त्यांची मुख्य समस्या खेळते भांडवलाची सोडविली पाहिजे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी उद्योजकांना दिले, तर चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सद्य परिस्थीतिचा आढावा घेताना लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग  तसेच व्यापारी व शेतकरी यांना जाणवत असलेल्या अडचणींबाबत तसेच उद्योग सुरू करण्यासाठी सरकारने दिलेल्या नियमावलीकडे लक्ष वेधले. या चर्चासत्रामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उद्योजकांशी संवाद साधला. दरम्यान, चेंबरचे राज्यभरातील प्रतिनिधी विवेक दालमिया, विनोद कलंत्री, राजू राठी, गिरीधर संगनेरिया,  पोपटलाल ओस्तवाल, विजय पुराणिक, आशिष पेडणेकर, रामभाऊ भोगले, मीनल मोहाडीकर, अनिलकुमार लोढा, रवींद्र मानगावे, शुभांगी तिरोडकर, प्रदीप पेशकार, धनंजय बेळे, अजित सुराणा, सुनीता फाल्गुने,  सोनल दगडे यांनी सहभाग घेत त्यांचे मत मांडले. शेवटी ललित गांधी यांनी आभार मानले. 

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटील