शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल साक्षरता प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:27 IST

मालेगाव तालुक्यातील सोनज येथे राज्य महिला आयोग, मुंबई व सेवाम संस्था सोनज यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण घेण्यात आले. उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या नाशिक विभागीय सदस्य रोहिणी नायडू यांनी केले. त्यांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती आणि विविध उपक्रमांची माहिती दिली.

ठळक मुद्देमालेगाव : सोनजला राज्य महिला आयोगातर्फे कार्यक्रम

मालेगाव : तालुक्यातील सोनज येथे राज्य महिला आयोग, मुंबई व सेवाम संस्था सोनज यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण घेण्यात आले. उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या नाशिक विभागीय सदस्य रोहिणी नायडू यांनी केले. त्यांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती आणि विविध उपक्रमांची माहिती दिली.उद्घाटन सेवाम संस्थेच्या प्रेसिडेंट संध्या गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. महिला बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे कुणाल परदेशी व महिला समुपदेशन केंद्राच्या अपेक्षा पगार, मिलिंद पोफळे, महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक विष्णू शेवाळे, कृषी पर्यवेक्षक रत्ना सूर्यवंशी, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या पर्यवेक्षक श्रीमती के. आर. मोरे, श्रीमती ए. पी. सावंत, श्रीमती जी. के. रॉय, श्रीमती यू. बी. ठोके, श्रीमती ए. व्ही. देवरे, श्रीमती ए. पी. बोरसे, श्रीमती आर. डी. विश्वकर्मा, श्रीमती के. बी. सुरंजे, विनोद जाधव व उदय सरदार आदी उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी १५६ महिलांनी सहभाग नोंदविला. प्रास्ताविक मोहन निकम यांनी केले.राज्य महिला आयोगाच्या प्रशिक्षक मानसी रायकर यांनी उपस्थितांना डिजिटल साक्षरता म्हणजे काय, डिजिटल साक्षरतेचे फायदे, डिजिटल अ‍ॅप - तेजस्विनी, आपले सरकार, उमंग यांचा वापर, डिजिटल देयकांचे फायदे आणि प्रकार, सुरक्षित डिजिटल देयके अदा करण्याबाबत सूचना, भीम अ‍ॅपबाबत पायाभूत माहिती, पैसे पाठविण्याच्या पद्धती, शिल्लक तपासणी, भीम अ‍ॅपद्वारे बिले भरणे याबाबत मार्गदर्शन केले.

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासWomenमहिला