शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

सामूहिक शौचालयांसाठी जागांची अडचण

By admin | Updated: May 17, 2016 00:11 IST

स्वच्छ भारत : ३७४ लाभार्थ्यांकडून अनुदान हडप

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय उभारणीचा कार्यक्रम महापालिकेमार्फत राबविला जात असून, वैयक्तिक शौचालयांना प्रतिसाद मिळत असताना सामूहिक शौचालयांसाठी मात्र जागांची अडचण येत आहे. जागाच उपलब्ध होत नसल्याने या योजनेला ब्रेक लागला आहे, तर आतापर्यंत ३७४ लाभार्थ्यांना अनुदान देऊनही त्यांनी बांधकामही केले नाही आणि पैसेही परत केलेले नसल्याने मनपा प्रशासनापुढे पेच उभा राहिला आहे.महापालिकेमार्फत शहरातील ६९५० लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधून दिले जाणार असून, त्यांना त्यासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान अदा केले जाणार आहे, तर ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना एकत्रित करून त्यांच्याकरिता २२४ ठिकाणी सामूहिक शौचालय उभारले जाणार आहेत. आतापर्यंत महापालिकेने ३२१७ लाभार्थ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले आहे, तर उर्वरित सहा हजार रुपये अनुदान शौचालयाचे बांधकाम केल्यानंतर अदा केले जाणार आहे. त्यातील १८७८ शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे, तर ५७८ शौचालयांचे काम सुरू आहे. महापालिकेने ३७४ लाभार्थ्यांना अनुदान दिले, परंतु त्यांच्याकडून शौचालयांचे बांधकामही केले जात नाही आणि अनुदानही परत केले जात नाही. महापालिकेने संबंधितांना नोटिसाही बजावल्या आहेत. त्यातील १६१ लाभार्थ्यांनी अनुदानाची रक्कम परत करत शौचालय उभारणीस असमर्थ असल्याचे कळविले आहे. अनुदान लाटणाऱ्यांची संख्या नाशिकरोडमध्ये सर्वाधिक २९५ इतकी आहे. त्याखालोखाल पंचवटीत ३४, पश्चिम विभागात २८ आणि पूर्व विभागात दोन लाभार्थी आहेत. अनुदान परत न केलेल्या लाभार्थ्यांचे सर्वप्रथम प्रबोधन केले जाणार असून, त्यांना शौचालय उभारणीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी सांगितले. दरम्यान, सामूहिक शौचालय योजनेसाठीही सरकारमार्फत ३४ हजार ६०० रुपये अनुदान दिले जाते, परंतु सामूहिक शौचालयांसाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने या योजनेला काहीसा ब्रेक लागला आहे. (प्रतिनिधी)