शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चिप एटीएम कार्डामुळे वाढल्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:47 IST

सुरक्षिततेच्या कारणास्तव रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाने मॅग्नेटिक एटीएम कार्ड बंद करून आता चिपवाले एटीएम कार्ड सुरू करण्यात आले आहेत. हजारो ग्राहकांना बॅँकांच्या माध्यमातून अशाप्रकारचे नवे चिपवाले कार्ड वितरित करण्यात आलेले आहे. मात्र बाजारात स्वॅप मशीनवर हे कार्ड प्रतिसाद देत नसल्याने ग्राहकांच्या अडचणी वाढल्या आहेत. नव्या कार्डामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेपेक्षा कार्डाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकार्ड स्वॅप होईना : कार्ड असूनही ग्राहकांचा खोळंबा

नाशिक : सुरक्षिततेच्या कारणास्तव रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाने मॅग्नेटिक एटीएम कार्ड बंद करून आता चिपवाले एटीएम कार्ड सुरू करण्यात आले आहेत. हजारो ग्राहकांना बॅँकांच्या माध्यमातून अशाप्रकारचे नवे चिपवाले कार्ड वितरित करण्यात आलेले आहे. मात्र बाजारात स्वॅप मशीनवर हे कार्ड प्रतिसाद देत नसल्याने ग्राहकांच्या अडचणी वाढल्या आहेत. नव्या कार्डामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेपेक्षा कार्डाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.जुन्या एटीएम कार्डातील रकमेच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाल्याने रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाने ग्राहकांना चीपवाले एटीएम कार्ड पुरविले जात आहे. मात्र या कार्डामुळे सोय होण्याऐवजी गैरसोयच अधिक झाली आहे. बाजारातील स्वॅप मशाीनमध्ये नव्या कार्डाला अडचणी येत आहेत. सातत्याने स्वॅपचा प्रयत्न करूनही कार्ड वापरात येत नसल्यामुळे ग्राहकांची गैरसोय वाढली आहे.शासनाच्या आदेशानुसार ग्राहकांनी बॅँकेत जाऊन आपल्या नावाचे नवीन चिपवाले कार्ड आणले आहेत. परंतु या चीपच्या कार्डमुळे ग्राहकांना पैसे उपलब्ध करण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.शहरातील तसेच महामार्गावरील अनेक पेट्रोलपंपचालकाकडे कार्ड स्वॅप केल्यानंतरही पैसे खात्यातू कट होत नसल्याचे वादाचे प्रसंगदेखील निर्माण झाले आहेत. हॉटेल्समध्येदेखील चीपवाले कार्ड स्वॅप होत नसल्याचे चित्र आहे. नवे कार्ड बाजारात आल्यापासून कार्ड स्वॅप करण्याच्या अडचणी वाढल्या असल्याचे सांगितले जाते.नवे कार्डही प्रतिसाद देत नाहीजुने कार्ड बंद झालेले असून, नवे कार्डही अपेक्षित प्रतिसाद देत नसल्यामुळे ग्राहकांना मोठी अडचण सहन करावी लागत आहे. नव्या कार्डातून पैसे निघण्यास विलंब तरी होती किंवा पैसे काढतांना ‘ऐरर’ दाखवित असल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्राहकांना नवे कोरे एटीएम कार्ड देण्यात आले मात्र कार्ड वापरताना नाहक मनस्ताप होत आहे. काही ठिकाणी आठ ते दहा वेळा प्रयत्न केल्यानंतर कार्ड स्वीकारले जाते. केवळ स्वॅप मशीनवरच नव्हे तर अनेक एटीएमवरदेखील ग्राहकांना अशाच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :MONEYपैसाBanking Sectorबँकिंग क्षेत्र