शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना अंडी पोहोचविण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 23:53 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता संचारबंदी व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी आॅनलाइन संपर्क साधून नियमित कामकाजाचा आढावा घेतला.

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता संचारबंदी व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी आॅनलाइन संपर्क साधून नियमित कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी लॉकडाउनमुळे ग्रामीण भागात अंडीचा व केळीचा पुरवठा करण्यात येत असलेल्या अडचणीसमोर आल्या असून, दूरवरच्या वाहतुकीमुळे अंडी फुटण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कोणालाही बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलेला असून, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या मासिक सभा होत नाही, मात्र कामकाजाचा आढावा घेणे गरजेचे असल्याने महिला व बालकल्याण सभापतींनी जिल्ह्यातील सर्व बालविकास अधिकाºयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बालविकास प्रकल्पातील कामकाजाचा आढावा घेतला. त्यात अंगणवाडीतील बालकांना ५० दिवस पुरेल इतका पोषण आहाराचे वाटप झालेले असून, ३० मेपर्यंत पुरेल इतका आहार पुरवठा करण्यात आला आहे. तसेच गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींनादेखील आहाराचे वाटप झाले आहे. मालेगाव प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी अति दक्षता घेऊन आहाराचे वाटप करावे, अशा सूचना सभापतींनी दिल्या. कुपोषित बालकांची संख्येत वाढ होऊ नये यासाठी त्यांना ताजा आहार देण्याची कार्यवाही सुरू असून, सभापती अश्विनी आहेर यांनी राज्याचे महिला व बालविकास आयुक्तयांच्याशी चर्चा करून सर्व बालकांना १५ मेपासून गरम ताजा आहार देण्यास मान्यता दिली आहे, असे महिला व बालविकास अधिकारी दीपक चाटे यांनी सांगितले.आदिवासी भागात ‘अमृत आहार’ वाटपासाठी केळी उपलब्ध होत नाही. त्यामुळे अंडी वाटपाचे काम केले जात असले तरी, स्थानिक गावात अंडी उपलब्ध करताना आदिवासी भागात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. इतर गावांतील बाजाराच्या ठिकाणाहून अंडी आणून पुरवठा केला जात आहे. मात्र अंड्यांची वाहतूक करताना अंडी फुटण्याचे प्रमाण वाढल्याचे सुरगाणा व त्र्यंबकेश्वरच्या अधिकाºयांनी सांगितले. असे असले तरी, अंडी वाटपात नाशिक जिल्हा राज्यात अव्वल असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदfoodअन्न