शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मयत कर्मचाऱ्याच्या वेतन भत्त्यातील फरक लाटला परस्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:54 IST

ओझर : आशिया खंडात सर्वाधिक अग्रेसर असलेल्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मयत कर्मचाºयाचे सातव्या वेतन आयोगातील सुमारे एक लाख वीस हजार रुपये फरकाची रक्कम परस्पर काढून त्याची योग्य विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ओझर : आशिया खंडात सर्वाधिक अग्रेसर असलेल्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मयत कर्मचाºयाचे सातव्या वेतन आयोगातील सुमारे एक लाख वीस हजार रुपये फरकाची रक्कम परस्पर काढून त्याची योग्य विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.मयत पारस लखीचंद कोचर हे वीस वर्षांपासून बाजार समितीत कामास होते. सप्टेंबर २०१६ ला त्यांचे निधन झाले. तत्पूर्वी २०१५ ला बाजार समितीत सभापती दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत २०१४ साली केंद्राने अंमलात आणलेल्या महागाई भत्तावेतन देण्याचे ठरवले होते. तशी मागणी संचालक भास्कर बनकर यांनी केली होती. त्याची रक्कम जवळपास एक कोटी ऐंशी लाख होती. त्यामुळे त्याला दोन टप्प्यात विभागले गेले. २०१५ आॅक्टोबरमध्ये दिवाळीत पहिला फरक सर्व कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आला. तेव्हा कोचर हे हयात असल्याने त्यांना ती रक्कम मिळाली. त्यानंतर २०१७ ला जेव्हा दुसरा हप्त्याची रक्कम जमा करण्याचे ठरले तेव्हा कोचर यांचे २०१६ लाच निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या वाट्याची एक लाख वीस हजार रुपयांची रक्कम ही सचिव संजय पाटील यांनी कर्मचारी जयवंत तेलंग यांच्या अ‍ॅक्सिस बँक खाते क्र. ५११०१०१०००२९६३४ या खात्यावर वर्ग केल्याचा आरोप कोचर यांच्या पत्नी शर्मिला यांनी केला आहे.सचिव संजय पाटील व जयवंत तेलंग यांनी जे संगनमत करून रकमेची विल्हेवाट लावल्याने आमच्या कुटुंबाची मोठी फसवणूक झाल्याचे शर्मिला कोचर यांनी अर्जातम्हटले असून, याबाबत तालुका व जिल्हा निबंधकांकडे दाद मागितली आहे.-----------------------माझ्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. आमची परिस्थिती हलाखीची असल्याने मी सभापती, सचिव यांना नियमाप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या दुसºया हप्त्याची रक्कम मिळावी यासाठी विनंती केली. कोणीही यात मला दाद दिली नाही. यानंतर मला माहिती मिळाली की सचिवांनीच तेलंग यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे. अफरातफर करणाºया संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी जेणेकरून इतर कुणा वारसदाराला त्रास होणार नाही.- शर्मिला कोचर(मयत कर्मचाºयाची पत्नी)------------------------------------------------पारस कोचर हे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. सन २०१५ साली त्यांच्यावर निफाड अर्बन बँकेच्या कर्जाची रक्कम काही प्रमाणात थकीत होती. त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने बँकेचे कर्मचारी बाजार समितीत वसुलीसाठी अटक वॉरंट घेऊन आले, तेव्हा मी त्यांची हमी घेऊन पन्नास हजार रु पये भरले होते. सदर रक्कम काढण्यात आली हे खरे जरी असले तरी त्यात आम्ही कोणतीही अफरातफर केलेली नाही.- संजय बी. पाटील, सचिव, पिंपळगाव बाजार समिती

 

टॅग्स :Nashikनाशिक