शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्टतील आमदारांची कार्यक्षमता संपली काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:57 IST

मुळात साहित्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैभव असलेल्या सावानाकडून राजकीय स्तरावरील अशा पुरस्कारांची योजनाच केली जाऊ नये, असा एक मतप्रवाह पुरस्कार सुरू करण्यापूर्वीच होता. त्यातही, राजकीय स्तरावर दरवर्षी ‘आदर्श’ लोकप्रतिनिधी शोधणे जिकिरीचे बनणार असल्याची कल्पना त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांना आल्याने पुरस्काराचे नामाभिधान ‘आदर्श’ ऐवजी ‘कार्यक्षम’ आमदार पुरस्कार असे करण्यात आले होते.

नाशिक : मुळात साहित्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैभव असलेल्या सावानाकडून राजकीय स्तरावरील अशा पुरस्कारांची योजनाच केली जाऊ नये, असा एक मतप्रवाह पुरस्कार सुरू करण्यापूर्वीच होता. त्यातही, राजकीय स्तरावर दरवर्षी ‘आदर्श’ लोकप्रतिनिधी शोधणे जिकिरीचे बनणार असल्याची कल्पना त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांना आल्याने पुरस्काराचे नामाभिधान ‘आदर्श’ ऐवजी ‘कार्यक्षम’ आमदार पुरस्कार असे करण्यात आले होते. ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी आमदार माधवराव लिमये यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार नेर्लीकर दाम्पत्याने दिलेल्या देणगीतून दिला जातो. स्वत: माधवराव हे पत्रकार आणि उत्तम लेखकही होते. त्यामुळे सावानाने या पुरस्कार आयोजनाचे पालकत्व स्वीकारले आणि आतापर्यंत १७ आमदारांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्टÑ विधानसभा आणि विधान परिषदेतील कार्यक्षम व उल्लेखनिय कामगिरी बजावणाºया आमदारांना हा पुरस्कार दिला जातो. मात्र, १७ वर्षांतच हा पुरस्कारराज्यस्तराऐवजी राष्टय स्तरावर देण्याची कल्पना कुठून आणि कोणाच्या सुपीक डोक्यातून अवतरली, हा मनोरंजनाचाच भाग ठरावा. महाराष्टÑ विधानसभेचे २८८ आणि विधानपरिषदेचे ७८ आमदार आहेत. दर पाच वर्षांनी होणाºया निवडणुकांमुळे दोन्ही सभागृहात अनेक नवे चेहरे येत असतात. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार महाराष्टÑात प्रतिष्ठेचा मानला जातो. हा पुरस्कार आपल्याला मिळावा, यासाठी राज्यभरातील आमदारांना अपेक्षा असते. पुरस्कारासाठी नियुक्त निवड समितीला राज्यभरात कोणता आमदार कसे काम करतो, याची ढोबळस्वरूपात माहिती असते आणि त्यासंबंधीच्या अधिकच्या प्रतिक्रियाही तेथील मतदारांकडून जाणून घेतल्या जातात. मात्र, आता या पुरस्काराचे स्वरूप राष्टÑीय केल्याने आणि त्यात आमदारांबरोबरच खासदारही घुसविल्याने हा पुरस्कार देताना निवड समितीची डोकेदुखी वाढणार आहे. मुळातच तेलंगणा, छत्तीसगढ अथवा मिझोरामच्या आमदार-खासदारास या पुरस्काराने सन्मानित करताना महत्त्व नेमके कुणाचे वाढणार, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पुरस्काराची व्याप्ती वाढविल्याने यापुढे हा पुरस्कार महाराष्टÑाबाहेरील खासदार-आमदार यांनाच दिला जाण्याची शक्यता वाढल्याने महाराष्टÑातील लोकप्रतिनिधी दुर्लक्षित होण्याची शक्यता आहे. त्यातही महाराष्टÑातील लोकप्रतिनिधींची कार्यक्षमता संपुष्टात आली काय, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.सावानात काही लोकांना अनपेक्षित अशी पदे मिळाल्याने त्यांच्याकडून नावीन्याच्या ध्यासापोटी यासारखे अनाकलनीय निर्णय घेतले जाऊ लागल्याने त्यांचे स्वागत होण्याऐवजी ते हास्यास्पदच अधिक ठरू लागले आहेत.राज्यस्तराऐवजी राष्टय स्तरावर देण्याची कल्पना कुठून आणि कोणाच्या सुपीक डोक्यातून अवतरली, हा मनोरंजनाचाच भाग ठरावा. महाराष्टÑ विधानसभेचे २८८ आणि विधानपरिषदेचे ७८ आमदार आहेत. दर पाच वर्षांनी होणाºया निवडणुकांमुळे दोन्ही सभागृहात अनेक नवे चेहरे येत असतात. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार महाराष्टÑात प्रतिष्ठेचा मानला जातो. हा पुरस्कार आपल्याला मिळावा, यासाठी राज्यभरातील आमदारांना अपेक्षा असते. पुरस्कारासाठी नियुक्त निवड समितीला राज्यभरात कोणता आमदार कसे काम करतो, याची ढोबळस्वरूपात माहिती असते आणि त्यासंबंधीच्या अधिकच्या प्रतिक्रियाही तेथील मतदारांकडून जाणून घेतल्या जातात. मात्र, आता या पुरस्काराचे स्वरूप राष्टÑीय केल्याने आणि त्यात आमदारांबरोबरच खासदारही घुसविल्याने हा पुरस्कार देताना निवड समितीची डोकेदुखी वाढणार आहे. मुळातच तेलंगणा, छत्तीसगढ अथवा मिझोरामच्या आमदार-खासदारास या पुरस्काराने सन्मानित करताना महत्त्व नेमके कुणाचे वाढणार, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पुरस्काराची व्याप्ती वाढविल्याने यापुढे हा पुरस्कार महाराष्टÑाबाहेरील खासदार-आमदार यांनाच दिला जाण्याची शक्यता वाढल्याने महाराष्टÑातील लोकप्रतिनिधी दुर्लक्षित होण्याची शक्यता आहे. त्यातही महाराष्टÑातील लोकप्रतिनिधींची कार्यक्षमता संपुष्टात आली काय, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.सावानात काही लोकांना अनपेक्षित अशी पदे मिळाल्याने त्यांच्याकडून नावीन्याच्या ध्यासापोटी यासारखे अनाकलनीय निर्णय घेतले जाऊ लागल्याने त्यांचे स्वागत होण्याऐवजी ते हास्यास्पदच अधिक ठरू लागले आहेत.

टॅग्स :libraryवाचनालयMLAआमदार