शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वीरशेत येथे अतिसाराची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 01:03 IST

तालुक्यातील वीरशेत परिसरातील आदिवासी बांधवांना अतिसाराची लागण झाली असून, गावातील बंद असलेल्या हातपंपाचे दूषित पाणी प्यायल्याने अतिसार या साथीने आदिवासी दुर्गम भागात थैमान घातले आहे. बुधवारी दुसऱ्या दिवसापर्यंत रुग्णांची संख्या ३७ पर्यंत पोहोचली आहे.

कळवण : तालुक्यातील वीरशेत परिसरातील आदिवासी बांधवांना अतिसाराची लागण झाली असून, गावातील बंद असलेल्या हातपंपाचे दूषित पाणी प्यायल्याने अतिसार या साथीने आदिवासी दुर्गम भागात थैमान घातले आहे. बुधवारी दुसऱ्या दिवसापर्यंत रुग्णांची संख्या ३७ पर्यंत पोहोचली आहे.  कळवण उपजिल्हा रु ग्णालयात मंगळवारी रात्री उपचारासाठी दाखल केलेल्या दिलीप लक्ष्मण गवळी (१८ ) यांची तपासणीसह वैद्यकीय उपचार केल्याने प्रकृतीत सुधारणा झाली आहे. वीरशेतच्या हरिश्चंद्र जाधव (४०) यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला.  अतिसाराच्या रु ग्णांची संख्या वाढत असल्याने आदिवासी बांधव भयभीत झाले आहेत. वीरशेतच्या जिल्हा परिषद शाळेत अतिसाराच्या  रु ग्णावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. तर काही रुग्णांनाची वैद्यकीय तपासणी करून प्रकृती ठीक असल्याकारणाने त्यांना घरी पाठविण्यात आले.  दरम्यान वीरशेत येथे बुधवारी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, यशवंत गवळी, कळवण पंचायत समितीचे सभापती लालाजी जाधव, उपसभापती विजय शिरसाठ, माजी सभापती मधुकर जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय डेकाटे, साथरोग वैद्यकीय अधिकारी दिनेश पाटील, कळवणचे तहसीलदार कैलास चावडे, यांनी भेट देऊन रु ग्णांची विचारपूस  केली.गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे पथक मंगळवारपासून वीरशेत येथे तळ ठोकून आहेत.  गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. गावाला पाणीपुरवठा करणारे सर्व स्रोत बंद करण्यात आले असून, ज्या रु ग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना अधिक उपचारासाठी दळवट, कळवण व नाशिक येथे पाठवण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद