शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

हिरे यांची आयुक्तांविरोधात भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:31 IST

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सिडकोतील अतिक्रमणे हटविण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईला पावसामुळे ब्रेक मिळाला असला तरी आता ही घरे वाचविण्यासाठी भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत

नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सिडकोतील अतिक्रमणे हटविण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईला पावसामुळे ब्रेक मिळाला असला तरी आता ही घरे वाचविण्यासाठी भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. मुख्यमंत्र्याचे आदेश आयुक्त जुमानत नसल्याने ही याचिका दाखल केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तथापि, आयुक्तांविरोधात सरकार पक्षाच्याच आमदारांनी अशाप्रकारची भूमिका घेतल्याने हा राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरला आहे.  महापालिकेकडे सिडकोतील सर्व योजना हस्तांतरित झाल्या आहेत. या वसाहतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढीव बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा होतोच, शिवाय आपत्काळातदेखील मोठी अडचण निर्माण होऊ शकते. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने अडचणीचा विषय ठरला असला तरी जनक्षोभ टाळण्यासाठी आजवर या विषयाला कोणी हात घातला नव्हता. मात्र, महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या विषयात हात घातला आणि अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही सुरू केली. सुरुवातीला अनेक अतिक्रमणे हटविल्यानंतर प्रशासनाने सर्व घरांवर फुल्या मारण्यास सुरुवात केल्याने नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया उमटली. निवेदने आणि धरणे आंदोलने झाल्यानंतर राजकीय स्पर्धाही वाढली. दरम्यान, आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय मांडला. त्यानंतर त्यांनी निवेदनावर कार्यवाही करावी असे लिहून देत आयुक्तांच्या कारवाईस स्थगिती दिल्याचे पत्र दिले होते. मात्र, आयुक्तांनी अशाप्रकारचे लेखी आदेश दाखवा, असे आमदारांच्या माहितीसंदर्भात सुनावले होते. त्यानंतर हिरे यांनी निवेदनावरील कार्यवाहीचे आदेश देखील दाखविले होते; परंतु त्यावर स्पष्टता नसल्याचे पालिकेचे म्हणणे होते. दरम्यान, आंदोलने तीव्र होत असताना महापालिकेने देखील सबुरीची भूमिका घेत जनक्षोभामुळे कारवाई स्थगित करीत असल्याचे जाहीर केले होते.  दरम्यान, आता याच विषयावर आमदार हिरे यांनी बुधवारी (दि.१३) उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून, सिडकोतील घरे वाचविण्याची विनंती केली आहे. सदरची घरे रहिवाशांनी स्वखर्चाने बांधल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे