शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
5
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
6
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
7
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
8
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
9
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
10
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
11
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
12
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
13
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
15
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
16
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
17
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
18
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
19
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
20
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण

हिरे कुटुंबीयांचे राजकीय वर्तुळ पूर्ण

By श्याम बागुल | Updated: December 8, 2018 00:55 IST

कॉँग्रेसच्या विचारसरणीत घडलेल्या हिरे कुटुंबीयांनी नेहमीच सत्तेच्या परिघातच राहणे पसंत केले, परिणामी पुष्पाताई हिरेंच्या रूपाने राज्याच्या सत्तेवर अनेक वर्षे या कुटुंबाने राज्य केले. कालांतराने राजकारणाचे वारे काहीसे उलटे फिरू लागताच, पुष्पातार्इंचे पुत्र प्रशांत हिरे यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत उचलले. पुन्हा राज्यात व केंद्रात कॉँग्रेस आघाडीची सत्ता येताच, राष्टÑवादीशी घरोबा केला. परंतु राष्टÑवादीने जिल्ह्णाचे राजकीय नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्द करताच, नाराज हिरे कुटुंबीयांनी स्वत:ला काहीकाळ विजनवासात कोंडून घेतले. साडेचार वर्षांपूर्वी सर्वत्र भाजपाचा बोलबाला सुरू झाला असता, प्रशांत हिरे यांचे पुत्र अपूर्व यांनी शिक्षक मतदारसंघातून अपक्ष निवडून येत सत्ताधारी भाजपाचे सहयोगी सदस्यत्व पत्करले. आता राज्यातील राजकीय वातावरणात होत असलेल्या बदलाच्या वारूवर स्वार होत, हिरे कुटुंबीयांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ कॉँग्रेसच्या घराण्याशी नाळ जोडून घेत आपले राजकीय वर्तुळ पूर्ण केले.

नाशिक : कॉँग्रेसच्या विचारसरणीत घडलेल्या हिरे कुटुंबीयांनी नेहमीच सत्तेच्या परिघातच राहणे पसंत केले, परिणामी पुष्पाताई हिरेंच्या रूपाने राज्याच्या सत्तेवर अनेक वर्षे या कुटुंबाने राज्य केले. कालांतराने राजकारणाचे वारे काहीसे उलटे फिरू लागताच, पुष्पातार्इंचे पुत्र प्रशांत हिरे यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत उचलले. पुन्हा राज्यात व केंद्रात कॉँग्रेस आघाडीची सत्ता येताच, राष्टÑवादीशी घरोबा केला. परंतु राष्टÑवादीने जिल्ह्णाचे राजकीय नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्द करताच, नाराज हिरे कुटुंबीयांनी स्वत:ला काहीकाळ विजनवासात कोंडून घेतले. साडेचार वर्षांपूर्वी सर्वत्र भाजपाचा बोलबाला सुरू झाला असता, प्रशांत हिरे यांचे पुत्र अपूर्व यांनी शिक्षक मतदारसंघातून अपक्ष निवडून येत सत्ताधारी भाजपाचे सहयोगी सदस्यत्व पत्करले. आता राज्यातील राजकीय वातावरणात होत असलेल्या बदलाच्या वारूवर स्वार होत, हिरे कुटुंबीयांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ कॉँग्रेसच्या घराण्याशी नाळ जोडून घेत आपले राजकीय वर्तुळ पूर्ण केले.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ. अपूर्व प्रशांत हिरे यांनी मुंबईत राष्टÑवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्याने त्यातून नाशिक जिल्ह्यातील राजकारणात भविष्यात काही उलथापालथीची शक्यता व्यक्त केली जात असली तरी, जिल्ह्णाच्या राजकारणावर भुजबळ यांची असलेली मजबूत पकड पाहता, हिरे कुटुंबीयांना भुजबळ यांच्याशी मिळते-जुळते घेऊनच आगामी वाटचाल करावी लागणार आहे. निव्वळ हिरेंच्या प्रचारसभेला भुजबळ उशिरा पोहोचल्याने पराभव पत्करावा लागला या एकमेव कारणातून निर्माण झालेल्या भुजबळ द्वेषातून हिरे कुटुंबीयांनाही गेल्या साडेचार वर्षांत फारसे काहीही साध्य झाले नाही या वास्तवाचे भान जसे त्यांना उमगले तसेच त्याची अप्रत्यक्ष किंमत भुजबळ यांनाही काहीशी भोगावी लागली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांच्या पराभवाला नाही म्हटले तरी, हिरेंची नाराजीही काही प्रमाणात कारणीभूत राहिली आहे. परंतु आता भुजबळ यांनाही याची जाणीव झाली व त्यातूनच हिरे यांच्या राष्टÑवादीचा प्रवेश सुकर झाला हेदेखील मान्य करावे लागेल. ज्या भुजबळ यांच्यामुळेराजकीय विजनवासात पत्करावा लागला. त्या भुजबळांशी उघडपणे दोन हात करण्याचे आव्हानदेणाऱ्या हिरे कुटुंबीयांनीच जुळवून घेण्यास पुढाकार घेतला, त्यातूनच तुरुंगात असलेल्या भुजबळयांना कोर्टात भेटण्यास हिरेंनी धाव घेऊन संवादाचा पहिला सेतू निर्माण केला व प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून समीर भुजबळ यांनी हिरेंचा उंबरठा ओलांडल्याने या दोन्ही कुटुंबीयातील जवळीकता वाढीस लागली.आता हिरे स्वगृही परतल्याने त्यामागे नक्कीच राजकीय असेलच हे जसे नाकारता येणार नाही, तसेच हिरे यांनासोबत ठेवल्यानेच भुजबळ यांचीही जिल्ह्यातील राजकीय वाटचाल सुकर होणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस