शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कृषी आयुक्तांकडून शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 16:04 IST

सिन्नर : तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी आधुुनिक तंत्रज्ञानावर संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासह मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देसिन्नरच्या शेतकऱ्यांसोबत बैठक : चंदन शेतीस विमा संरक्षण मिळण्याची मागणी

सिन्नर : तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी आधुुनिक तंत्रज्ञानावर संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासह मार्गदर्शन केले.रिसोर्स बँकेतील शेतकरी, चंदन व सोलापूर लाल डाळिंब शेतीचा प्रयोग राबविणारे तालुक्यातील उजनी येथील राम मोहन सुरसे यांच्याकडून पीकांविषयी माहिती घेतली, तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांशी शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत संवाद साधला. चंदन शेतीस विमा संरक्षण, संरक्षणात्मक बाबींसाठी शासकीय अर्थसाहाय्य मिळावे, यासह इतर मागण्यांचे निवेदन सुरसे यांनी आयुक्तांना दिले.कृषी आयुक्त कुमार यांनी सिन्नर तालुक्याचा दौरा केला. नायगाव येथील गोदा दारणा अग्रो प्रोड्युसर कंपनीच्या एकात्मिक कृषी विकास (आयएडी) कांदा प्रकल्पास भेट देत कांदा खरेदीबाबत माहिती घेतली. यावेळेस अध्यक्ष एकनाथ सानप, संचालक रवींद्र कापडी, अर्जुन दिघोळे, गणेश पानसरे, संदीप लहाने, मंडळ कृषी अधिकारी महेश वेठेकर, कृषी पर्यवेक्षक रणजित आंधळे, कृषी सहायक सचिन भगत आदी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे राज्यस्तरीय पीक स्पर्धा विजेते सुहास वसंतराव बर्वे, अप्पासाहेब नामदेव आरोटे यांची भेट देऊन शेतीत वापरलेल्या तंत्रज्ञानाबाबत चर्चा केली. याप्रसंगी नानासाहेब संधान, योगेश संधान, सुनील गाडे, मनोज गाडे, लक्ष्मण बर्गे, हरिराम गाडे, निखिल बर्वे, अशोक वाजे, विभागीय कृषी सह संचालक संजीव पडवळ, विभागीय कृषी अधीक्षक अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, सहायक अर्चना चौधरी, वंदना कुऱ्हाडे, प्रदीप भोर, दीपक कुसळकर उपस्थित होते.पीक स्पर्धेत सिन्नरची आघाडीरबी हंगाम २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील ५३ शेतकऱ्यांनी गहू पिकात सर्वसाधारण गटात, तर आदिवासी गटात ५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. हरभरा पिकात १५ सर्वसाधारण शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. या राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. यात डुबेरे येथील सुहास वसंतराव बर्वे यांनी ९०.७१० क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादकतेसह राज्यात प्रथम, तर महाजनपूर येथील अप्पासाहेब नामदेव आरोटे यांना ९० क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादकतेसह द्वितीय क्रमांक मिळाला आहे. 

टॅग्स :Governmentसरकारagricultureशेती