शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

कृषिनगर रस्त्यावर ‘धुळवड’

By admin | Updated: August 14, 2016 22:54 IST

कचचा खच : वाहने घसरून अपघात; रस्त्यावर साचली माती

नाशिक : सायकलसर्कलपासून ते जुने पोलीस आयुक्तालयापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कच व माती साचल्याने वाहने घसरून अपघात होत आहे. वाहतुकीमुळे संपूर्ण रस्ता धुळीत हरवत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.पावसानंतर शहरातील सर्वच रस्त्यांभोवती माती आणि बारीक कचचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे. दुभाजकांभोवती साचलेली माती किंवा चौफुलीवर सखल भागात पसरलेल्या कचचा खच विविध रस्त्यांवर आढळून येत आहे. पावसाने आठवडाभरापासून विश्रांती घेतली असली तरी अद्याप शहरांमधील महत्त्वांच्या रस्त्यांची स्वच्छता महापालिकेने सुरू केलेली नाही. त्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत असून, रस्त्यांवरून मार्गस्थ होताना डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कृषिनगर जॉगिंग ट्रॅकच्या प्रारंभीपासून तर थेट सायकलसर्कलपर्यंत रस्त्यावर कच पसरली असून, या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून ‘धुळवड’ उडत आहे. दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना या रस्त्यावरून मार्गस्थ होणे अवघड झाले आहे. चारचाकी वाहनांची वाहतूक आणि रस्त्यावर साचलेली कच यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या दुचाकीचालक, पादचाऱ्यांसह जॉगिंग ट्रॅकवरून फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनाही धुळीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून जाताना वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. (प्रतिनिधी)