शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

कर्करोगासह अन्य आजारांवर माफक दरात उपचार शक्य नव्या आरोग्य केंद्राची मुहूर्तमेढ : धारिवाल धर्मार्थ रुग्णालयाने मिळणार दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:56 IST

नाशिक : वैद्यकीय उपचार दिवसेंदिवस महाग होत असताना आणि खासगी शासनाने कितीही सक्ती केली तरी दवाखान्यांकडून म्हणावे तितक्या प्रमाणात गरिबांवर सवलतीच्या दरात उपचार केले जात नसल्याने उपचाराअभावी आजार वाढण्याचे आणि उपचाराअभावी मृत्युमुखी पडणाºयांचे प्रमाण लक्षणीय आहे.

ठळक मुद्देरुग्णांना सवलतीच्या दरात उपचारराज्यभरातील गरजू रुग्णांना सेवा घेता येणार

नाशिक : वैद्यकीय उपचार दिवसेंदिवस महाग होत असताना आणि खासगी शासनाने कितीही सक्ती केली तरी दवाखान्यांकडून म्हणावे तितक्या प्रमाणात गरिबांवर सवलतीच्या दरात उपचार केले जात नसल्याने उपचाराअभावी आजार वाढण्याचे आणि उपचाराअभावी मृत्युमुखी पडणाºयांचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाची, समाजातील दीनदुबळ्यांची, गोरगरिबांची सेवा करून ऋण व्यक्त करण्याची मोठी कामगिरी करण्याचे कामही मूळ धरू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर पंचवटीतील पेठरोड परिसरात ‘रसिकलाल धारिवाल’ धर्मार्थ रुग्णालयाच्या रूपाने जिल्ह्यासह राज्यभरातील रुग्णांना सवलतीच्या दरात उपचाराच्या संधीची भेट नवीन वर्षात मिळणार आहे.जैन समाजातील सर्व संस्था, संघटनांच्या पुढाकाराने हा भव्य प्रकल्प साकारला जात असून, मध्यमवर्गीय, गोरगरीब रुग्णांना खासगी दवाखान्यांमधील दरांच्या तुलनेतील ७० टक्के सवलतीच्या दरात येथे उपचार केले जाणार आहेत. हा दवाखाना पुणे येथील प्रसिद्ध रूबी हॉस्पिटलशी संलग्न असणार आहे. या दवाखान्यात केवळ नाशिक शहरातील, जिल्ह्यातीलच नाही, तर राज्यभरातील गरजू रुग्णांना सेवा घेता येणार आहे. दवाखान्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. एप्रिलच्या दरम्यान हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. या दवाखान्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती कै. रसिकलाल माणिकलाल धारिवाल, शोभा धारिवाल यांनी ११ कोटी रुपयांची घसघशीत मदत केली असून, जैन समाजबांधव, सर्व जातीय समाजबांधवांनी ९ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. स्व. हुकूमचंद बागमार यांच्या कल्पनेतूनआणि प्रेरणेतून एक लाख स्क्वेअर फूट परिसरात आठ मजली सुसज्ज असे रुग्णालय साकारले जात असून, १६५ बेडच्या या रुग्णालयात एमआरआय, सीटीस्कॅन, लिनर थिएटर (कॅन्सर तपासणी व उपचार), आॅपरेशन थिएटर, आयसीयू, जरनल वॉर्ड आदींची सोय आहे. प्रारंभी अस्थिरोग, स्त्रीरोग, जनरल सर्जरी, नेत्र तपासणी व उपचार आदींची सेवा दिली जाणार आहे.देणगीदारांना मदतीचे आवाहनआर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय उपचार घेऊ न शकणाºया रुग्णांना सवलतीच्या दरात वा मोफत उपचार मिळण्यासाठी पुणे, मुंबई गाठावे लागते. तेथेही राज्यभरातील रुग्णांची गर्दी पाहता नंबर लागणे कठीण असते. शिवाय अशा मोठ्या शहरांमध्ये दवाखान्यांपर्यंत पोहोचणे, तेथील स्थितीचे आकलन करणे, उपचारासाठी तेथे मुक्काम करावा लागण्यास येणाºया अडचणी पाहता रुग्ण व नातेवाईक काहीसे गांगरलेले असतात. अशांसाठी नाशिकसारख्या शहरात हे रुग्णालय वरदान ठरणार आहे. सर्व जाती-धर्मांतील नागरिकांनी या दवाखान्याच्या कामासाठी देणगी द्यावी, असे आवाहन दवाखाना समितीने केले आहे. या देणगीद्वारे ते उपकरणांवर, खोल्यांवर नावे देऊ शकतील.