शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धांद्रीच्या विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 02:19 IST

सटाणा : तेरा वर्षांपासून सुरू असलेल्या सासरच्या जाचास कंटाळून धांद्री येथील विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सात जणांविरु द्ध गुन्हा दाखल असून, पती, सासूसह दिरास अटक केली आहे.

ठळक मुद्देहुंडाबळीचा गुन्हा पती, सासूसह तिघांना अटक

सटाणा : तेरा वर्षांपासून सुरू असलेल्या सासरच्या जाचास कंटाळून धांद्री येथील विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सात जणांविरु द्ध गुन्हा दाखल असून, पती, सासूसह दिरास अटक केली आहे.देवळा तालुक्यातील तीसगाव येथील केदा पंडित गायकवाड यांची बहीण सरला हिचा विवाह निंबाबाई रामचंद्र मोरे यांचा मुलगा शरद यांच्याशी झाला. विवाह झाल्या पासूनच त्यांच्यात खटके उडत होते. हुंडा आणला नाही आणि आवडत नसल्यामुळे सरलाचा सासरच्यांकडून छळ सुरू होता. याला कंटाळून सरलाने सोमवारी रात्री दिलीप चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. विवाहितेचा मृतदेह अडकल्यामुळे पोलिसांनी लोहणेर येथील पट्टीच्या पोहणाऱ्या जवानांना पाचारण केले. तब्बल आठ तासांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह सापडला. विवाहितेचा भाऊ केदा गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी शरद रामचंद्र मोरे (पती), निंबाबाई मोरे (सासू), आबाजी मोरे, मीना भगवान धिवरे , मंगला बलराज जगताप, आशा अंबादास पानपाटील, संगीता रामचंद्र मोरे यांच्याविरु द्ध हुंडाबळी व आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे.सरलाचा खून झाल्याचा आरोप करत तिच्या माहेरच्यांनी मंगळवारी पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. वैद्यकीय अहवालात पाण्यात बुडूनच सरलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले़

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हा