शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजातर्फे काळ्या गुढ्यांनी निषेधं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:30 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्याचे आश्वासन देत शिवसेना-भाजपने राज्यात सत्ता मिळविली. मात्र चार वर्षे होऊनही शासन धनगर समाजला आरक्षण देण्यात चालढकल करत असल्याने समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून, मनेगाव येथे धनगर समाजबांधवांनी घरावर काळ्या कापड्याच्या गुढ्या उभारून शासनाचा निषेध नोंदविला.

सिन्नर : गेल्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्याचे आश्वासन देत शिवसेना-भाजपने राज्यात सत्ता मिळविली. मात्र चार वर्षे होऊनही शासन धनगर समाजला आरक्षण देण्यात चालढकल करत असल्याने समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून, मनेगाव येथे धनगर समाजबांधवांनी घरावर काळ्या कापड्याच्या गुढ्या उभारून शासनाचा निषेध नोंदविला.आरक्षणासाठी धनगर समाजाने आता राज्यभर एल्गार पुकारलेला असून, त्याचाच एक भाग म्हणून धनगर समाजबांधवांनी आपापल्या घरावर शासनाच्या निषेधार्थ ‘काळ्या गुढ्या’ उभाल्या. अनुसूचित जमाजी प्रवर्गात असलेल्या ‘धनगड’ ही जात अस्थित्वात नसून धनगर हे धनगड आहेत. त्याच धर्तीवर धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज करत आहे. तथापि, वेळोवेळी राजकारण्यांनी समाजाला आरक्षणाचे ‘गाजर’ दाखवून सत्ता मिळविली. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने प्रचारादरम्यान सत्ता मिळताच समाजाला मागणीप्रमाणे आरक्षण देवू, असे आश्वासन दिले.त्यामुळे राज्यभरातील समस्त धनगर समाजबांधव भाजप-शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले व केंद्रातील तसेच राज्यातील सत्ता मिळवून देण्यात हातभार उचलला. आरक्षण देण्याचा विसर पडला. गेल्या चार वर्षांत समाजाच्या वतीने शांततेत मोर्चे काढून, निवेदने देवून आरक्षणाची मागणी केली, मात्र त्याकडे शासन दुर्लक्ष करीत असून समाजाला आरक्षण देण्यास चालढकल करीत असल्याची समाजाची भावना झाली आहे. त्यामुळे समाजाचे नेते गोपीचंद पडवळ व उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली समाजाने एल्गार पुकारून महाराष्टÑभर शासनाच्या विरोधात वेगवेगळे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.याप्रसंगी अ‍ॅड. सी. डी. भोजने, माजी सरपंच मीराबाई बुचुडे, भाऊसाहेब रोडे, अशोकराव बुचुडे, अण्णासाहेब ढवण, रामभाऊ भुचुडे, महेश बुचुडे, नीलेश रोडे आदी उपस्थित होते.दि. १२ ते १९ डिसेंबर या कालवधीत धनगर समाजबांधवांनी आपापल्या घरांवर ‘काळ्या गुढ्या’ उभारल्या आहेत. मनेगाव येथे धनगर समाजबांधवांनी आपापल्या घरावर ‘काळ्या गुढ्या’ उभारून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :NashikनाशिकDhangar Reservationधनगर आरक्षण