रावळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जंतनाशक दिनानिमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला. तळवाडेचे माजी सरपंच संजय पवार प्रमुख पाहुणे होते मुख्याध्यापक जे. एन. खैरनार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रावळगाव प्राथमिक आरोग्याच्या अधिकारी वैशाली चव्हाण, मुख्याध्यापक जे. एन. खैरनार यांनी शरीरात जंत होण्याचे दुष्परिणाम व जंतावरील औषधांचे फायदे समजवून दिले. तसेच विशाखा समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या वतीने, किशोरवयीन मुलींना शारीरिक बदलाविषयी पूनम भामरे आणि विजया गावित यांनी मार्गदर्शन केले. उपशिक्षका सुनीता देवरे व कविता कापडणीस यांनी जंत नाशक दिनाचे महत्त्व पटवून दिले. व्ही. पी. संसारे यांनी सूत्रसंचालन केले. आभार व्ही. बी. देवरे यांनी मानले कार्यक्रमास मदतनीस, मंदाकिनी पवार, सरला अहिरे, शोभा सोनवणे, शिक्षक एस.एम, पवा, आर. एच. देसले, डी. बी. देवरे, ए. व्ही. निकम, एल. एन. कोर, व्ही. बी. देवरे, व्ही. पी, संसारे, आर. व्ही. कडलग, एम. एच. पठाण, वाय. बी. दाणी उपस्थित होते.
तळवाडे भामेश्वर जनता विद्यालयात जंतनाशक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST