शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

देवळाली कॅम्प पोलिसांनी भगूर पोलीस चौकीचे दार उघडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:13 IST

भगूर पोलीस चौकी बंद या ‘लोकमत’मधील बातमीची दखल घेऊन बुधवारी देवळाली कॅम्प पोलिसांनी तत्काळ या चौकीतून दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली असून, यापुढे दररोज चौकी उघडी ठेवून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

भगूर : भगूर पोलीस चौकी बंद या ‘लोकमत’मधील बातमीची दखल घेऊन बुधवारी देवळाली कॅम्प पोलिसांनी तत्काळ या चौकीतून दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली असून, यापुढे दररोज चौकी उघडी ठेवून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.  ‘महिन्यातून पंधरा दिवस भगूर पोलीस चौकी बंदच’अशा आशयाचे वृत्त बुधवारच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आल्याने त्याची पोलीस यंत्रणेने गांभीर्याने दखल घेत, या चौकीसाठी जमादार ए. एस. ढगे, हवालदार अनिल अहिरे यांची नेमणूक करण्यात आल्याने त्यांनी बुधवारी सकाळी चौकी उघडून दोन महिलांनी केलेल्या तक्रार अर्जाचे कामकाज सुरू केले.  या संदर्भात त्यांनी विचारणा केली असता, ते म्हणाले, पोलीस चौकी उघडी असते परंतु काही वेळा न्यायालयीन कामकाज, परिसरातील गावातील तक्रारींची चौकशी, बंदोबस्तासाठी अन्यत्र नेमणूक केली जात असल्यामुळे अशा कामांसाठी चौकी बंद ठेवावी लागते; मात्र यापुढे चौकी कायम चालू राहील. शिवाय भगूर, राहुरी, दोनवाडे, लहवित, वंजारवाडी, शेणीत गावच्या नागरिकांनी भगूर पोलीस चौकीत फोन केला तरी त्याची दखल घेतली जाईल.  दरम्यान, अनेक दिवसांपासून बंद राहणारी पोलीस चौकी बुधवारी उघडी असल्याचे पाहून भगूरकरांनी समाधान व्यक्त केले असून, समाजकंटक, टवाळखोर, गुन्हेगारांना मात्र असुरक्षित वाटू लागले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय