शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नासाका गिळंकृत करण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:14 IST

नाशिक सहकारी साखर कारखान्यावर अवसायक नेमून तो गिळंकृत करण्याचा सहकार मंत्र्यांचा डाव असल्याचा आरोप शनिवारी (दि.२८) झालेल्या विशेष सभेत सभासदांनी केला. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात नासाकाच्या प्रश्नावरून त्यांना घेराव घालण्याचा निर्धारही सभेत करण्यात आला.

नाशिकरोड : नाशिक सहकारी साखर कारखान्यावर अवसायक नेमून तो गिळंकृत करण्याचा सहकार मंत्र्यांचा डाव असल्याचा आरोप शनिवारी (दि.२८) झालेल्या विशेष सभेत सभासदांनी केला. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात नासाकाच्या प्रश्नावरून त्यांना घेराव घालण्याचा निर्धारही सभेत करण्यात आला.नासाकाची विशेष सर्वसाधारण सभा कार्यस्थळावरील हॉलमध्ये प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष तानाजी गायधनी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कारखान्याने २०१७-१८ चा गळीत हंगाम सुरू करण्याची सर्व तयारी सुरू असताना व सहकार मंत्र्यांनी नेमलेले प्राधिकृत मंडळ कार्यरत आहे तरीदेखील अचानक प्राधिकृत मंडळ रद्द करून अवसायक नेमण्याची कार्यवाही सुरू करणे, जिल्हा बॅँकेने कारखाना विक्री व २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याबाबत निविदा प्रसिद्ध केल्याने सभेत सभासदांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.  यावेळी माजी संचालक पी. बी. गायधनी यांनी कारखाना व शेतकºयांबाबत शासनाचा दृष्टिकोन चांगला नसून सहकार क्षेत्र संपवून खासगीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. कारखान्यावर भाजपाप्रणीत प्राधिकृत मंडळ असताना कारखान्याची मालमत्ता गिळंकृत करण्याच्या दृष्टिकोनातून हे मंडळ बरखास्त करून त्यांच्यासह सभासदांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप गायधनी यांनी केला. राज्यात कुठेही २५ वर्षांच्या मुदतीसाठी कारखाना भाडेतत्त्वाने दिलेला नाही. मात्र नासाकाबाबत जिल्हा बॅँकेला हाताशी धरून सहकार मंत्र्यांनी ही खेळी केली असल्याचाही आरोप करण्यात आला.  यावेळी काशीनाथ जगळे, हभप रामनाथ महाराज शीलापूरकर, अशोक खालकर, माधव गंधास, संतू पाटील हुळहुळे, संजय धात्रक, श्रीकांत गायधनी, अ‍ॅड. सुभाष हारक, चिंतामण विंचू आदींनी नासाकाबाबत शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष तानाजीराव गायधनी यांनी प्राधिकृत मंडळ नियुक्ती ते अवसायक नियुक्तीपर्यंतचा आढावा सांगून सहकारमंत्र्यांच्या भूमिकेची माहिती दिली.जिल्हा बॅँकेच्या कार्यकारी संचालकांची भूमिकासुद्धा संशयास्पद असून, आतापर्यंत कारखान्याने बॅँकेला १२५ कोटी रुपये व्याजापोटी भरल्याचे गायधनी यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या सोमवारी होणाºया जनता दरबारात नासाका प्रश्नावरून घेराव घालण्याचा निर्धार सभेत करण्यात आला.