शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

‘शाही’ मिरवणुकीला भाविक मुकणार

By admin | Updated: August 25, 2015 23:36 IST

निर्बंध : पोलिसांच्या मनमानीमुळे सारेच हतबल

नाशिक : भाविकांची गर्दी, त्यातच सुरक्षतेचा प्रश्न याचा बाऊ करून पोलिसांनी जे निर्बंध केले आहेत, त्याचा फटका थेट साधू-महंतांनाही बसणार असून, अंगकांती सजवलेले आणि सुंगधित फुलांची आभूषणे परिधान करून रथावर आरूढ होऊन शाही मिरवणुकीत सहभागी झालेले महंत केवळ त्यांच्याजवळ असलेले अनुयायी आणि पोलीसच बघू शकतील. कारण भाविकांना मिरवणूक मार्गापासून कोसो दूर ठेवण्याचे नियोजन करून ठेवण्यात आले आहे. दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा आणि त्यात होणारी पर्वणी ही जगभरातील भाविकांना आकर्षित करीत असतात. या आकर्षणापोटीच लाखो भाविक कुंभमेळा भरेल त्याठिकाणी येतात. आताही नाशिकला एका पर्वणीला किमान एक कोटी भाविक येतील असे नियोजन आहे. पारंपरिक शस्त्रांचे खेळ आणि धर्मध्वजा घेऊन निघालेल्या या साधू-महंतांच्या अग्रणी इष्टदेवता म्हणजेच रामलल्लाच्या मूर्त्या असतात. या इष्ट देवतांचीच शाही मिरवणूक मानली जाते. ही मिरवणूक तपोवनातून पारंपरिक मार्गाने रामकुंडावर पोहोचते, तेव्हा स्नानासाठी उत्सुक साधू-महंतांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. त्यांच्या शाही मिरवणुकीला पाहून भाविक नतमस्तक होत असतात, परंतु पोलिसांच्या अति दक्षतेमुळे साधू-महंतांना त्यांच्या ‘शाही’ मिरवणुकीचे ‘वैभव’ भाविकांना दाखविता येणार नाही की भाविकांना नतमस्तक होता येणार नाही. त्यामुळे बारा वर्षांनी होणारा हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणार आहे किंवा नाही हे दिसूच शकणार नाही. नाशिकरोडच्या भाविकांनी दसक पंचकला स्नान करा, नाशिकच्या भाविकांना दुपारी दोन वाजेनंतर गोदापात्रात परवानगी अशा पोलिसांच्या निर्बंधांमुळे शाही मिरवणूक बघणे कोणालाही शक्य होणार नाही. त्यामुळे आखाड्यातील अनुयायी, निवडक हितचिंतक आणि बंदोबस्ताला असलेले पोलीस यांनाच हे भाग्य लाभणार आहे. (प्रतिनिधी)