शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली कॅन्टोंमेंट बोर्डाचे उत्पन्न घटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 18:08 IST

लष्करी आस्थापनेकडे थकीत असलेले सेवाकररूपी ६५ कोटींपैकी किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळाल्यास येथील रस्त्यांच्या दुरुस्ती कामाला गती मिळेल. तसेच देशभरात सरकारने जीएसटी लागू केला.

ठळक मुद्देमहासंचालकांशी चर्चा : पावणेपाच कोटींचा फटकाजकातीच्या स्वरूपात मिळणाऱ्या पावणेपाच कोटींची प्रतिवर्षी घट

देवळाली कॅम्प : लष्करी आस्थापनेकडून येणे असलेल्या ६५ कोटींच्या सेवाकरासह जीएसटी लागू करूनही केंद्र व राज्य शासनाकडून परतावा मिळत नसल्याने प्रतिवर्षी पावणेपाच कोटी रुपयांनी उत्पन्न घटल्याने कॅन्टोंमेंट बोर्डाच्या शिष्टमंडळाने कन्स्ट्रक्शन विभागाच्या नवनियुक्त महासंचालक दीपा बाजवा यांची भेट घेतली.देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रमुख असलेल्या महासंचालक बाजवा या पुणे येथील दक्षिण विभागाच्या कार्यालयास भेट देण्यासाठी आल्या असता देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष मीना करंजकर, नगरसेवक बाबूराव मोजाड, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, कावेरी कासार, प्रभावती धिवरे यांसह माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, भाऊसाहेब धिवरे आदींच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी देवळालीतील विविध प्रश्नांवर चर्चा करताना दक्षिण विभाग संचालक के.एल. पेगू, संचालक विभा शर्मा, संचालक संजीव कुमार हे उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने देवळालीतील विकासकामांना चालना देणेकामी लष्करी आस्थापनेकडे थकीत असलेले सेवाकररूपी ६५ कोटींपैकी किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळाल्यास येथील रस्त्यांच्या दुरुस्ती कामाला गती मिळेल. तसेच देशभरात सरकारने जीएसटी लागू केला. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाला जकातीच्या स्वरूपात मिळणाऱ्या पावणेपाच कोटींची प्रतिवर्षी घट झाल्याचे सांगितले. शासनाकडून हा निधी प्राप्त होणे गरजेचे असून, स्वच्छ भारत अभियानांर्तगत देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने स्वनिधीतून खर्च करीत आधुनिक अशा घंटागाडी व प्रत्येक नागरिकाच्या घरात स्वतंत्र दोन डस्टबिनचे वाटप केल्याचे सांगितले. दरवर्षी शासनाच्या आदेशाप्रमाणे वेळोवेळी स्वच्छता अभियानही राबविले जात आहे त्यासाठी अर्थसहाय्य मिळावे, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा मोफत दिल्या जात असून, दर्जा कायम असल्याने आजूबाजूच्या ३२ खेड्यांतील नागरिकही लाभ घेत आहे. वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन प्रस्तावित नव्या इमारतीसाठी १२ कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली तसेच आनंद रोड मैदानावरील आठ एकर जागेत उभारावयाचे क्रीडा संकुलाकामी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी, शहरातील बेरोजगारांसाठी हौसन व वडनेर रोडवरील प्रस्तावित व्यापारी संकुलाला मंजुरी मिळावी आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक